शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या 30 वर्षांनंतर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, दुखावलेल्या पतीने विष घेऊन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 22:16 IST

पती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना पत्नीची पोलिसांत तक्रार.

MP News : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाच्या 30 वर्षानंतर एका महिलेने आपल्या पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. यामुळे दुखावलेल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अवधपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 52 वर्षीय राजीव गिरी सौम्या स्टेट कॉलनीत राहत होते. मूळ रायसेन जिल्ह्यातील राजीव यांचा विवाह 30 वर्षांपूर्वी जानकी गिरी या महिलेशी झाला होता. आता लग्नाच्या तीस वर्षांनंतर 26 जानेवारी रोजी पत्नीने महिला पोलिस ठाण्यात राजीव यांच्याविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला.

या आरोपानंतर राजीव प्रचंड तणावात गेले. 5 दिवस अस्वस्थ राहिल्यानंतर त्यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी आत्महत्या केली. मृत राजीव गिरी यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. मुलीचे लग्न झाले आहे, तर मुलगा 25 वर्षांचा आहे.

महिला नवऱ्याला तशाच अवस्थेत सोडून गेली ...

अवधपुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी रतन सिंह परिहार यांनी सांगितले की, या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, राजीव जेव्हा विष प्राशन करुन हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाची झुंज देत होते, तेव्हा पत्नीने पोलिस स्टेशन गाठून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. आपला पती केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता, त्यामुळे तिने विष प्राशन केल्याचे पत्नीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी सुरू केला तपास पोलिसांनी ताबडतोब एका कॉन्स्टेबलला हॉस्पिटलमध्ये पाठवले, जेणेकरून राजीव यांची साक्ष नोंदवता येईल. परंतु, ते स्टेटमेंट देण्याच्या स्थितीत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर अर्ध्या तासात राजीवचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाdowryहुंडा