शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

श्री रामजन्मभूमी ट्रस्टची बनावट वेबसाइट बनवून घातला गंडा, पोलिसांच्या जाळ्यात आरोपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 20:34 IST

Cyber Crime Case :अविनाश बहुखंडी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील सी-20 इंद्रपार्क नजफगड येथील रहिवासी आहे.

अयोध्या -  दिल्लीतील एका तरुणाने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या नावाने बनावट वेबसाईट तयार केली होती. या तरुणाला अटक करण्यात सायबर क्राईम पोलिसांना यश आले आहे. अविनाश बहुखंडी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील सी-20 इंद्रपार्क नजफगड येथील रहिवासी आहे.सायबर क्राइम स्टेशनचे प्रभारी चंद्रभान यादव यांनी सांगितले की, 2020 मध्ये ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता, ज्याचा तपास या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. वेबसाईटच्या तपासणीत अविनाशचा ई-मेल, फोन आणि खाते क्रमांक उघडकीस आला.तो पूर्वी दिल्लीतील उत्तमनगर येथे राहत होता. टीम तिथे पोहोचल्यावर अविनाश घर विकून निघून गेल्याचे समजले. यानंतर दिल्लीतील नजफगडमध्ये तो असल्याचं आढळून आलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलीस पथकाने आरोपीला अटक केली. ट्रस्टच्या बनावट साईटच्या मदतीने आरोपींची फसवणूक करणाऱ्यांची नेमकी संख्या किती आहे, याचा अंदाज पोलिसांना लावता आलेला नाही. तपासादरम्यान आरोपींच्या चौकशीत याबाबत स्पष्टता होणार आहे.

आत्महत्येपूर्वी पीडितेने कोणाला केला होता कॉल, काय झालं बोलणं... कॉल डिटेल्स उघड

एफआयआरचे स्टेटस ऑनलाइन पाहायचे 

अविनाशने बनावट वेबसाईट तयार करून फसवणुकीचा कला धंदा करायचा. त्याचा गुन्हा पकडला जाण्याची भीती होती, म्हणून तो दररोज अयोध्येत ऑनलाईन अपलोड केलेल्या एफआयआरची स्थिती तपासत असे. 2020 मध्ये गुन्हा दाखल होताच त्याने वेबसाईटवरून लोगो आणि फोटो काढून टाकला होता. मात्र, तरीदेखील सायबर क्राइम पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAyodhyaअयोध्याPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी