शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भावांची हत्या करणाऱ्या आरोपीला दुहेरी जन्मठेप; १० वर्षांचा कारावासही भोगावा लागणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 09:38 IST

देवकर बंधू रात्री जेवण करून पावणेबाराच्या सुमारास घराबाहेर बसले होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आणि मनोज खांडगेसह दुचाकीवरून आलेल्या संजय नामदेव पाटील (वय ३८) ने तिघा भावांवर चाकूने सपासप वार केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण :  डिसेंबर २०१० मध्ये कल्याणमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी आरोपी संजय नामदेव पाटील याला दुहेरी जन्मठेप आणि १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. 

  मागील भांडणाच्या रागातून पश्चिमेकडील रामदासवाडी परिसरातील अशोक आणि कृष्णा देवकर या दोन सख्या भावांची संजयने, मनोज खांडगेसह दुचाकीवरून येऊन घराजवळच चाकूने वार करून हत्या केली होती. तर देवकर यांचा अन्य एक सख्खा भाऊ रामदास याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

देवकर बंधू रात्री जेवण करून पावणेबाराच्या सुमारास घराबाहेर बसले होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आणि मनोज खांडगेसह दुचाकीवरून आलेल्या संजय नामदेव पाटील (वय ३८) ने तिघा भावांवर चाकूने सपासप वार केले. यात अशोक (वय ४०) आणि कृष्णा (वय ३२) यांचा मृत्यू झाला तर, रामदास (वय ४२) हे गंभीर जखमी झाले होते. ही घटना ३ डिसेंबर २०१० घडली होती. रामदास यांच्या तक्रारीवरून  संजय आणि मनोज याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाण असे गुन्हे दाखल झाले होते. दोघा आरोपींना ४ डिसेंबरला अटक केली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. के. बानकर आणि पोलीस निरीक्षक आर. एम. आव्हाड यांनी या गुन्ह्याचा तपास करून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. निकाल  जिल्हा न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी दिला. सरकारी वकील म्हणून अश्विनी भामरे- पाटील यांनी काम पाहिले. 

दोघांपैकी एका आरोपीचा मृत्यूसंजय पाटील आणि मनोज खांडगे या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल होता. परंतू, मनोजचा न्यायालयात सुनावणी चालू असताना दरम्यानच्या कालावधीत मृत्यू झाला असल्याने संजय पाटील याला शिक्षा ठोठावण्यात आली.

टॅग्स :jailतुरुंग