शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला चार वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 19:15 IST

four years in prison जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पोस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  एका गावातील रहिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पोस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच विनयभंग प्रकरणात दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. आरोपीला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

एका गावातील रहिवासी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी म्हशीला पाणी पाजण्यासाठी गेली असता पाठीमागून बंटी ऊर्फ रामराव रामकृष्ण वक्ते हा आरोपी आला आणि त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणाची तक्रार मुलीने उरळ पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंडविधानाच्या कलम ३५४ अ, पोस्को कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास उरळ पोलिसांनी करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी बंटी ऊर्फ रामराव रामकृष्ण वक्ते यास भारतीय दंडविधानाच्या कलम ३५४ अ अन्वये दोन वर्षांची शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान केले आहे, तर पोस्को कायद्याच्या कलम ८ अनव्ये चार वर्षांची शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारच्या वतीने ॲड. राजेश अकोटकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला