शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, ११ गुन्हयांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 16:18 IST

मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून ११ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी दिली आहे.

एव्हरशाईन सिटी येथील स्टार रेसिडेन्सी कॉम्प्लेक्समध्ये राहणारे मंगेश शंकर चव्हाण (४२) हे १९ जूनला पहाटे साडेपाचच्या सुमारास ड्रीमलॕण्ड हाॅटेलमागे, स्मशानभूमी रोड परिसरात मॉर्निंग वॉक करत होते. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली होती. आचोळे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयात एकाच दिवशी सलग एकापाठोपाठ ३ चैन चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे अशा गुन्हयांना आळा घालणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी तात्काळ मार्गदर्शन व सुचना देवून पथके रवाना केली.     त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखाचे अधिकारी व अंमलदार यानी घडणा­या प्रत्येक चैन स्नॅचिंग गुन्हयाचे घटनास्थळी भेटी देऊन तांत्रिक विश्लेषण केले. या गुन्हयातील आरोपीचा आंबिवली पर्यंत माग घेण्यात आला. आरोपीबाबत माहिती मिळाल्यावर आरोपी अली हसन अफसर उर्फ अबु जाफरी (२४) हा निष्पन्न झाला. वरिष्ठांचे मार्गदर्शनाने आंबिवलीतील ईराणी वस्तीमध्ये आरोेपीच्या ठिकाणाची माहिती काढून स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपीच्या राहत्या घरी सापळा कारवाई केली. आरोपी घराच्या मागील खिडकीतून उडी मारुन आंबिवली येथील जंगलाच्या दिशेने पळून गेला. पोलीस पथकाने आरोपीचा जंगलाच्या दिशेने पाठलाग केला. पोलीस हवालदार शिवाजी पाटीलने दलदलीत लपलेल्या आरोपीला शिताफिने ताब्यात घेतल्यावर त्यांच्यात झटापटी झाली.  आरोपीकडे पोलीस कोठडीदरम्यान तपास केल्यावर चेन जबरी चोरीचे ७ गुन्हे, मोबाईल जबरी चोरीचे २ गुन्हे व गुन्हयात चोरी करण्याकरता वापरलेली दुचाकीसह, वाहन चोरीचे २ गुन्हे असे एकुण ११ गुन्हे उघड केले. गुन्हयात चोरीस गेलेले ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, २ मोबाईल फोन व २ दुचाकी असा एकुण ५ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द यापुर्वी ठाण्यात हद्दीत जबरी चोरी व वाहन चोरीचे ९ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश आंबुरे, सहा. पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, राजाराम काळे, सतिश जगताप, आसिम मुल्ला, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, अनिल नागरे, जयकुमार राठोड, हनुमंत सुर्यवंशी, मनोहर तावरे, सुनिल कुडवे, राजविर संधु, प्रविण पवार, संतोष चव्हाण, मसुब जवान सचिन चौधरी यांनी केलेली आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपारा