शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

'मोक्का'तील आरोपींनी कळंबा कारागृहातूनच रचले खंडणीचे षडयंत्र; गुंड बंटी जाधवसह तिघांना अटक

By दत्ता यादव | Updated: August 5, 2023 23:45 IST

वाई पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून कळंबा कारागृहात असलेला गुंड बंटी जाधवसह तिघांच्या मुसक्या आवळल्या.

सातारा : ‘मोक्का’च्या गुन्ह्यात कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात असलेल्या गुंडांनी थेट कारागृहातून फोन करून मेणवलीच्या हाॅटेल मालकाला तब्बल दहा लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली. यानंतर वाई पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून कळंबा कारागृहात असलेला गुंड बंटी जाधवसह तिघांच्या मुसक्या आवळल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेणवली, ता. वाई येथील ‘हॉटेल माधवन इंटरनॅशनल’मध्ये १ जून २०२३ रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास १५ जण गेले. हॉटेल व्यावसायिकाला पिस्तूल रोखून त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची त्यांनी मागणी केली. तसेच त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने ओढून संशयितांनी पलायन केले. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात एकूण १५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील १२ जणांना वाई पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. 

या खंडणीचे मुख्य सूत्रधार बंटी जाधव असून, त्याने त्याचे साथीदार निखील मोरे, अभिषेक मोरे यांच्या सोबतीने कळंबा कारागृहातूनच थेट फोनद्वारे हॉटेल मालकाला खंडणी मागितली. एवढेच नव्हे तर संशयितांनी खंडणीचे षडयंत्र कळंबा कारागृहातच रचले. त्यांच्या हस्तकांना हॉटेल मालकाकडे पाठवून त्यांनी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. ही बाब तपासात समोर आल्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी तातडीने तपास सुरू केला. 

मोक्कामध्ये कारागृहात असलेल्या आरोपींचा या गुन्ह्यात कसा सहभाग आहे, हे भरणे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना कारागृहातून वाई पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. शनिवारी वाई पोलिसांनी गुंड बंटी जाधव, निखील मोरे, अभिषेक मोरे यांना कळंबा कारागृहातून अटक केली. त्यानंतर त्यांना वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.   

कारागृहात फोन पोहोचला कसा...बंटी जाधवने थेट कारागृहातून खंडणी मागितली आहे. परंतु त्याच्याजवळ पोलिसांना फोन सापडला नाही. आता त्या दिवसाचे सीडीआर काढून पोलिस पुरावा गोळा करणार आहेत. तसेच कारागृहात फोन कोणी दिला, याची चाैकशी केली जाणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी