शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 12:26 IST

Hyderabad Rape and Murder Case: काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका 6 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती.

हैदराबाद: काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका 6 वर्षीय चिमुकलीचा बलात्कारानंतर खून करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. नागरिकांमध्ये त्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली. यातच आता या आरोपीचा संशयितरित्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी राजू याचा रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

9 सप्टेंबर रोजी आरोपी राजूने एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली होती. घटनेनंतर आरोपी फरार होता. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. प्रत्येकजण आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत होते. इतकच काय तर, तेलंगाणा सरकारमधील एका मंत्र्यानं 'नराधमाला पकडून थेट एनकाउंटर करू', अस वक्तव्यही केलं होतं. यातच आता आरोपीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. सूचना मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय. 

दरम्यान, तेलंगणा पोलिसांनी या व्यक्तीच्या मृतदेहाचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसली तरी पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीच्या अंगावरील टॅटू आणि आरोपीच्या अंगावरील टॅटू सारखेच आहेत. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाईल.

आरोपीने ट्रेनसमोर मारली उडी मीडियाशी बोलताना हैदराबाद पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश म्हणाले, 'आरोपीचा मृत्यू झाल्याची बातमी खरी आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून या संदर्भात अधिक माहिती घ्यावी लागेल. मला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आरोपीचा पाठलाग करत होते आणि त्याला शरण येण्याचा इशारा देत होते. पण, आरोपींने पोलिसांचे ऐकले नाही आणि ट्रेनसमोर उडी मारली.'

 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणCrime Newsगुन्हेगारी