शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 02:36 IST

पोलिसावर हल्ला करून पळून जाणाऱ्या आरोपीस पनवेल गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रथमेश धुमाळ असे या आरोपीचे नाव आहे. 

नवीन पनवेल : पोलिसावर हल्ला करून पळून जाणाऱ्या आरोपीस पनवेल गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रथमेश धुमाळ असे या आरोपीचे नाव आहे. ३१ जानेवारीला रात्री  नेरूळ पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई संतोष राठोड हे बालाजी मंदिर टेकडी, सेक्टर २०, नेरूळ येथून त्यांच्या वाहनाने जात असताना तेथे २० ते २५ वयोगटातील पाच जण हे आरडाओरड करीत असताना आढळून आले. त्यांच्याकडे एक विना नंबरप्लेट असलेली ॲक्टिवा मोटारसायकल होती. या मोटारसायकलबाबत पोलीस शिपाई संतोष राठोड यांनी विचारणा केली असता त्या पाच जणांनी त्यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी राठोड यांनी मदतीसाठी नेरूळ बीट मार्शल यांना कॉल केला असता त्याचा राग मनात धरून पाचही जणांनी यांच्या तोंडावर वार करून त्यांना खाली पाडले. त्यानंतर  दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच राठोड यांच्या चार चाकी गाडीवर दगड टाकून गाडीच्या फाेडल्या हाेत्या.  यबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार झाले होते.  या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश योगेश धुमाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याच्या ठावठिकाण्याबाबत गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी पाठपुरावा करीत असताना या आरोपीबाबत गुन्हे शाखा कक्ष २ चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना माहिती मिळाली.  या माहितीवरून गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली वैभव रोंगे आणि पोलीस नाईक सचिन म्हात्रे, रूपेश पाटील, दीपक डोंगरे यांनी गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश योगेश धुमाळ यास खांदेश्वर रेल्वे स्टेशन रिक्षा स्टॅण्ड परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्यास पुढील कारवाईसाठी नेरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई