शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप भोगताना पॅरोलच्या नावाखाली फरार झालेला आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 21:07 IST

या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5 च्या पथकाने नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देनाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातून सात वर्षापूर्वी पसार झालेला आरोपी शिवदासांनीपुढील तपासासाठी त्याला आता ओशिवारा पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे रणवरे यांनी सांगितले.

ठाणे -पत्नीच्या खून खटल्यात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपीची शिक्षा भोगत असतांना पॅरोलच्या नावाखाली गेल्या सात वर्षापासून फरार झालेल्या दर्शन शिवदासांनी (45, रा. जुहू, मुंबई) या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5 च्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याला आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातून सात वर्षापूर्वी पसार झालेला आरोपी शिवदासांनी हा मुंबईतील अंधेरी भागात वास्तव्यास असून तो ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील गोपाल आरम हॉटेल परिसरात 2 ऑक्टोबर रोजी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास रणवरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अनिल सुरवसे, प्रशांत पवार आणि जमादार बाबू चव्हाण आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने चारित्र्याच्या संशयावरुन 2008 मध्ये पीचा ओढणीने गळा आवळून तसेच चाकूने भोसकून खून केला होता. याप्रकरणी 5 एप्रिल 2008 मध्ये त्याच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला या खून प्रकरणी मुंबई जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना 30 दिवसांच्या अभिवचन (पॅरोल) रजेवर 8 सप्टेंबर 2011 रोजी तो बाहेर आला होता. ही रजा संपूनही तो कारागृहात हजर होण्याऐवजी 2011 पासून पसार झाला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात कलम 224 प्रमाणो गुन्हा दाखल झाला होता. फरार झाल्यापासून स्वत:चे नाव बदलून हैद्राबाद आणि दिल्ली येथे जेसन फर्नाडीस या नावाने तो वास्तव्य करीत होता. पुढील तपासासाठी त्याला आता ओशिवारा पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे रणवरे यांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकthaneठाणेMurderखूनPoliceपोलिस