शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरांना बेड्या; घरफोडीचे १४ तर सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:34 IST

या इराणी आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ महागड्या मोटरसायकलही हस्तगत केल्या आहेत.

ठळक मुद्दे या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी ६ अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्यात्यांच्याकडून पोलिसांनी २ मोटारसायकलसह २ लाख ४१ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

कल्याण - महात्मा फुले चौक पोलिसांनी घरफोडीचे सुमारे १४ तर अँटी रॉबरी स्कॉडने चैन स्नॅचिंगचे १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी ६ अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या महिन्यात पश्चिमेतील ठाणगेवाडी परिसरात असणाऱ्या मेडकीलच्या दुकानात चोरी झाली होती. दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी २ मोबाईल आणि रोकड चोरली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना महात्मा फुले चौक पोलिसांच्या हाती पप्पू सुंदर यादव, आकाश रमेश गोरे, दत्ता पाटील आणि दत्ता माटेकर ही चौकडी लागली.किराणा दुकान, मेडीकल स्टोअर्स, स्वीट मार्ट, कपड्याचे दुकानांचे शटर उचकटून हे आरोपी चोरी करत असल्याचे त्यांच्या तपासात समोर आले.  या चौघांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात ३, हिललाईनमध्ये ५, विठ्ठलवाडी २, कोळसेवाडी २, मानपाडा आणि नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात २ असे १४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी.ए.नांद्रे, हवालदार शिंदे, पोलीस नाईक निकाळे, चौधरी, भालेराव, चित्ते, भणगे, दळवी आणि पोलीस शिपाई पवार या पथकाने केली. त्यांच्याकडून पोलिसांनी २ मोटारसायकलसह २ लाख ४१ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये परिमंडळ ३ च्या अँटी रॉबरी स्कॉडने २ इराणी आरोपींना अटक केली असून चैन स्नॅचिंगचे ७ आणि वाहन चोरीचे ३ असे १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. काही दिवसांपूर्वी अँटी रॉबरी स्कॉडने आंबिवली येथील इराणी वस्तीतून कासीम अफसर इराणी याला अटक केली. त्याच्या तपासात कासीमने चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली देत या वस्तू विकणाऱ्या फिरोज सरवर इराणीचीही माहिती दिली.त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाणे २, महात्मा फुले १, कोळसेवाडी २, टिळकनगर १, डोंबिवली १, मुंब्रा १, विठ्ठलवाडी १ आणि खडकपाडा १ असे १० गुन्हे दाखल आहेत. तसेच हा आरोपी ठाणे पोलिसांच्या टॉप २० चैन स्नॅचरच्या यादीतील वॉन्टेड गुन्हेगार असल्याचेही पोलीस उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. मोक्का कायद्यांतर्गत गुन्ह्यामध्ये तो सध्या जामिनावर सुटला असून त्याची आई, २ भाऊ, बहिणीही या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कारवाई अँटी रॉबरी स्कॉडचे उपनिरीक्षक अविनाश पाळदे, हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक दिपक गडगे, नरेंद्र बागुल, अमोल गोरे, उपेश सावळे, हृषिकेश भालेराव, शिपाई रविंद्र हासे,  चिंतामण कातकडे, सुनील गावित आदींच्या पथकाने केली. या इराणी आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ महागड्या मोटरसायकलही हस्तगत केल्या आहेत.

 

टॅग्स :RobberyचोरीArrestअटकPoliceपोलिसChain Snatchingसोनसाखळी चोरीkalyanकल्याण