शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपीला १६ वर्षांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 13:30 IST

एलसीबीच्या वसई युनिटची कारवाई : नालासोपाऱ्यातील बांधकाम व्यावसायिक हत्या प्रकरण

ठळक मुद्देगँगस्टर लोकांशी हातमिळवणी करून राजेश पंतगे याची हत्या करण्याचा कट रचला होता. मोटार सायकलवरून आलेल्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती.

नालासोपारा - पूर्वेकडील तुळींज रोड येथे २००३ साली बांधकाम व्यावसायिकाची जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल १६ वर्षांनी एलसीबीने सोमवारी मुंबई येथून अटक केले आहे. कमलेश उर्फ कमल प्रताप अमोल जैन असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. मीरा रोड येथील पेणकर पाडा येथील जमिनीच्या वादावरून गँगस्टर लोकांशी हातमिळवणी करून राजेश पंतगे याची हत्या करण्याचा कट रचला होता.त्यावेळी १४ जणांविरूध्द नालासोपारा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून १० आरोपींना पोलिसांनीअटक केली होती. चार फरार आरोपीपैकी १ आरोपी हा मुंबई पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तीन फरार आरोपीपैकी कमलेश उर्फ कमल प्रताप अमोल जैन याला एलसीबीच्या वसई युनिटने मुंबईच्या बोरिवली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली.

२००३ साली घडली होती घटना

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोडवरील इमारतीमध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक राजेश पतंगे (४३) यांची २५ आॅक्टोबर २००३ साली सकाळी राधाकृष्ण हॉटेलजवळ मित्रासोबत उभे होते. त्यावेळी मोटार सायकलवरून आलेल्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती.

टॅग्स :ArrestअटकFiringगोळीबारPoliceपोलिस