शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावरील आरोप खोटा; पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 11:00 IST

बलात्काराची होती तक्रार, तपासात काय आढळले? वाचा सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याविरोधात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यांत मुंबई पोलिसांना कोणताही पुरावा न सापडल्याने त्याचा तपास बंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी शनिवारी बी समरी अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे सादर केला आहे. एका डॉक्टर महिलेने जिंदाल यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात शनिवारी हा अहवाल पोलिसांनी सादर केला. याप्रकरणी बी समरी अहवाल दाखल झाल्याचे तक्रारदार पक्षाला कळवण्यात आले आहे. अहवालानुसार, तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपांची पुष्टी करणारे पुरावे पोलिसांना प्राप्त झाले नसल्याचे नमूद आहे. जुहू परिसरात ३० वर्षीय तक्रारदार राहण्यास असून तिने न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता.

तपासात काय आढळले?

तक्रारदाराने घटनेनंतर खूप दिवसांनी तक्रार दाखल केली आहे. महिला अधिकाऱ्यामार्फत तक्रार नोंदवूनही पुरावे स्वत: सादर करणार असल्याचे सांगूनही त्यांनी अद्याप पुरावे सादर केलेले नाहीत. “तसेच, आम्ही तपास अधिकारी म्हणून सीआरपीसी १६४ नुसार पुरावे मिळविण्याच्या हेतूने आणि फिर्यादीचे म्हणणे रेकॉर्ड करण्यासाठी, वारंवार कोर्टात पत्र लिहूनही, ती फिर्यादीला माहिती देण्यासाठी जबाब नोंदवताना दिसून आली नाही. न्यायालयाचा वेळ वाया घालवला. तसेच ज्या हॉटेलमध्ये घटना घडल्याचे नमूद केले. तेथील साक्षीदाराकडे केलेल्या चौकशीत कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे समोर आले. एकूणच, तपासात  खटला महिलेने आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने दाखल केला असल्याचे म्हटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी