शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीने मदत मागताच पतीने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 13:24 IST

 प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात जाणारा प्रियकर अपघातात ठार

ठळक मुद्देअवघ्या बारा तासांत प्रकरणाचा छडा

केज (जि. बीड) :  प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात जाणारा प्रियकर दुचाकी व रिक्षाच्या अपघातात ठार झाला, तर प्रियकराच्या मृत्यूमुळे प्रेयसीने पूर्वीच्या पतीकडे मदत मागितल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला व  मृतदेह शिंदी ते विडा रस्त्याच्या कडेला टाकून दिला. हा प्रकार सकाळी साडेआठ नंतर उघडकीस आल्यानंतर केज पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत गुन्ह्याची उकल करीत खूनप्रकरणी आरोपी पतीला जेरबंद केले. 

तालुक्यातील नामेवाडी येथील शहादेव आश्रुबा वायबसे याचा कवितासोबत बाल विवाह झाला होता. कविता शहादेवपेक्षा चार वर्षांनी मोठी होती. दोघे ऊस तोडणीसाठी कारखान्यावर जात होते. त्याच वेळी तिचे संबंध मुकादम संतोष दगडू वाघमारे रा. विडा याच्याशी आल्यानंतर ती मागील काही वर्षापासून केज येथे समता नगर भागात भाड्याच्या खोलीत संतोष वाघमारे सोबत राहत होती. २८ आॅगस्ट रोजी संतोष वाघमारे व कविता शहादेव वायबसे या दोघांत वाद झाल्याने कविताने संतोष वाघमारे विरोधात केज पोलिस ठाण्यात  दिलेल्या फिर्यादीनुसार अत्याचार व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यात पोलिसांनी संतोष यास अटक केली होती. 

जामिनावर सुटल्यानंतर त्याने कविताला मस्साजोग येथे रविवारी रात्री भेटण्यास बोलावले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाल्याने संतोष रागाच्या भरात निघून गेला. मस्साजोगपासून काही अंतरावर दुचाकी व रिक्षाचा अपघात होऊन संतोष ठार झाला. ही माहिती समजल्यानंतर कविता हिने पती शहादेव वायबसेकडे मदत मागितली. शहादेवने कविताला  रस्त्यावर बोलावून घेत रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिचा गळा दाबून व स्कार्फने फाशी देऊन खून केला.

केज पोलिसांना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शिंदी ते विडा रस्त्यावर कविताचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत ओळख पटविली.  शवविच्छेदनानंतर कविता शहादेव वायबसे हिचा मृत्यू गळा दाबून व स्कार्फने आवळून झाल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी दिला. अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचा अपघात व फिर्यादी महिलेचा मृत्यू यामुळे पोलिसांना आधीच संशय बळावला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

अवघ्या बारा तासांत प्रकरणाचा छडापोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक अशोक आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलीस निरीक्षक पुरु षोत्तम चोबे, सपोनि   मुंडे व कर्मचाऱ्यांनी तपासचक्र वेगात फिरवित अवघ्या बारा तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघड केला. शहादेव वायबसे याने पत्नीचा खून केला असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अशोक आम्ले यांनी दिली.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिसArrestअटक