शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीत थरार! रस्त्याशेजारी झोपलेल्या 5 जणांना SUV ने चिरडले

By हेमंत बावकर | Updated: October 18, 2020 11:50 IST

Accident In Varanasi : मलिन बस्तीमध्ये रात्री उशिरा जोरदार आवाज झाला, यामुळे आजुबाजुच्या परिसरातील सारेच जागे झाले.

वाराणसीच्या भेलपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील पद्मश्री चौकाजवळ रस्त्याशेजारी झोपलेल्या मलिन वस्तीच्या लोकांना एका वेगाने येणाऱ्या एसयुव्ही कारने चिरडले. यामध्ये रस्त्याशेजारी झोपलेले 5 लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीएचयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये तसेच काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 

या अपघातानंतर संतापलेल्या लोकांनी चालकाला मारहाण केली. तसेच कारची देखील तोडफोड केली. खूप वेळ समजूत घातल्यानंतर त्यांनी चालकाला आणि कारला पोलिसांच्या ताब्यात दिले. मलिन बस्तीमध्ये रात्री उशिरा जोरदार आवाज झाला, यामुळे आजुबाजुच्या परिसरातील सारेच जागे झाले. एसयुव्हीने रस्त्य़ाशेजारी झोपलेल्या लोकांना चिरडत कठड्यावर आदळली. हा अपघात एवढा मोठा होता की एसयुव्हीच्या पुढील बोनट आणि आतील भाग पूर्णपणे उध्वस्त झाला होता. 

पाच जखमींमध्ये तीन महिला आणि एक बालक व एक पुरुष आहे. जखमी झाल्यानंतर लगेचच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मलिन बस्तीच्या लोकांनी अपघात झाल्यानंतर कारच्या चालकाला मारहाण केली. तसेच कारच्याही काच फोडल्या. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, लोक चालकाला त्यांच्या हवाली करण्यास तयार नव्हते. अखेर अधिकाऱ्यांनी संतप्त लोकांची समजूत घातली तेव्हा हे लोक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार झाले. पोलिसांनी आरोपी चालकाला कडक शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा या लोकांचा राग शांत झाला. 

टॅग्स :AccidentअपघातVaranasiवाराणसी