शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आरटीओत एसीबीची झडप : मोटर वाहन निरीक्षक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:51 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक नरेश पोलानी (वय ५७) यांना एसीबीच्या पथकाने ६० हजारांची लाच स्वीकारताना आज रंगेहात पकडले.

ठळक मुद्दे६० हजारांच्या लाचेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक नरेश पोलानी (वय ५७) यांना एसीबीच्या पथकाने ६० हजारांची लाच स्वीकारताना आज रंगेहात पकडले.यातील तक्रारदार इंदोर (मध्यप्रदेश) येथील आजादनगरातील रहिवासी आहे. एका ट्रॅव्हल्स कंपनीत ते व्यवस्थापक असून, त्या कंपनीच्या ट्रॅव्हल्स इंदोर ते नागपूर मार्गावर प्रवासी वाहतूक करतात. पोलानी खुर्सापार चेक पोस्टवर कार्यरत असताना त्यांच्या नजरेत या कंपनीच्या बसेस आल्या. त्यांनी विविध मुद्यांना अधोरेखित करून या मार्गावर पाच बसेस चालविण्यासाठी ८० हजार रुपये महिना एन्ट्री फी मागितली. तडजोडीअंती हा सौदा ६० हजारात पक्का करण्यात आला. मात्र, महिन्याला एका बसचे १२ हजार रुपये मागितले जात असल्याने आणि ते जास्त वाटत असल्याने ट्रॅव्हल्स कंपनीच्या मंडळींनी पुन्हा रक्कम कमी करण्याची मागणी केली. त्याला नकार दिल्यामुळे कंपनीच्या कार्यालयातील तक्रारदार व्यवस्थापकाने एसीबीच्या अधीक्षकांकडे शुक्रवारी सकाळी धाव घेतली. आरटीओ कार्यालयावर अनेक दिवसांपासून नजर ठेवून असणाऱ्या एसीबीसाठी ही आयती संधी होती. वेळ घालविल्यास संधी दवडली जाण्याची भीती असल्याने त्यांची लगेच तक्रार नोंदवून घेण्यात आली. या तक्रारीची तेवढ्याच तत्परतेने शहानिशा करण्यात आली. पोलानी यांनी ६० हजारांची रक्कम पंचासमक्ष मागितल्याने एक भक्कम पुरावा एसीबीला मिळाला. त्यामुळे एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अप्पर अधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. त्यानुसार, तक्रार करणाराने रक्कम देण्याची तयारी दाखवून कधी आणि कुठे यायचे, अशी विचारणा केली. पोलानीने आपल्या अमरावती मार्गावरील गिरीपेठमध्ये असलेल्या कार्यालयात लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार, ६० हजार रुपये घेऊन तक्रारदार आणि त्याच्यापासून काही अंतरावर एसीबीच्या पथकातील मंडळी आरटीओ कार्यालयात पोहचली. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पोलानीने ही लाचेची रक्कम स्वीकारताच तक्रारदाराने बाजूला असलेल्या एसीबीच्या मंडळींना इशारा केला. त्याचक्षणी एसीबीच्या पथकाने पोलानींवर झडप घेऊन त्यांना जेरबंद केले. या कारवाईमुळे एसीबीत प्रचंड खळबळ निर्माण झाली. कारवाईची कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्यानंतर एसीबीने नंतर पोलानीच्या हजारीपहाड येथील निवासस्थानी पथक पाठविले.एसीबीचे पथक तेथे रात्रीपर्यंत झाडाझडती घेत होते. तेथे काय मिळाले, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. पोलानीविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप जगताप, हवलदार प्रवीण पडोळे, सुनील कळंबे, नायक प्रभाकर बले, लक्ष्मण परतेती, वकील शेख आदींनी ही कारवाई केली.निवृत्तीला काही महिने शिल्लकपोलानीला एसीबीने पकडल्याच्या वृत्ताने प्रादेशिक परिवहन विभागात खळबळ निर्माण झाली आहे. पोलानींच्या निवृत्तीला तीन ते चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अशात ते एसीबीकडून पकडले गेल्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या आरटीओतील अनेकांचे धाबे दणाणले आहे.

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागRto officeआरटीओ ऑफीसBribe Caseलाच प्रकरण