शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला २० वर्षांची सक्तमजुरी; १ लाख ५५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 08:54 IST

मिनीडोअर रिक्षामध्ये प्रवास करीत असताना ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयानं ठोठावली शिक्षा.

अलिबाग : मिनीडोअर रिक्षामध्ये प्रवास करीत असताना ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला माणगाव सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी व  एकूण १ लाख ५५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.  पुंडलिक मधुकर तर्डे असे त्याचे नाव असून, १ मार्च २०२० रोजी महाड येथील टोळ गावच्या हद्दीत त्याने हे कृत्य केले होते. विशेष व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी महिला दिनाच्या दिवशी शिक्षा सुनावली.

एक दाम्पत्य  ११ वर्षांच्या मुलीसह विक्रम रिक्षाने महाड ते वीर असा प्रवास करीत होते. मुलीच्या शेजारी  पुंडलिक तर्डे बसला होता. विक्रम रिक्षा टोळ गावच्या हद्दीत येताच  तर्डेने पीडित मुलीच्या मांडीवर ठेवलेल्या पिशवीच्या खालून हात घालीत तिच्याशी लैंगिक चाळे केले. या घटनेची महाड तालुका पोलिसांनी फिर्याद घेतली होती.  पुंडलिक तर्डेविरोधात भा.दं.वि.सं. कलम ३७६ सह पोक्सो ४, ८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन एम. गवारे यांनी करीत दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालय, माणगाव-रायगड येथे झाली. 

पीडित मुलीची साक्ष ठरली महत्त्वाचीगुन्ह्यात पीडित मुलीची साक्ष व फिर्यादी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी काम पहिले. पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक  यू.एल. धुमास्कर, मपोह छाया कोपनर, पोह शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. विशेष व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी पुंडलिक तर्डे याला दोषी ठरवून कलम ३७६  (१) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व रु. ५० हजारांचा दंड, कलम ४ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपयांचा दंड, कलम ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व १ लाख ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी