शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘भास्कर’ समूहातील २२०० काेटींचे गैरव्यवहार उघड; ‘सीबीडीटी’ने छापेमारीनंतर दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:04 IST

प्राप्तिकर खात्याने २२ जुलैला भाेपाळ, नवी दिल्ली, इंदूर, अहमदाबाद आणि मुंबईसह ४० ठिकाणी दैनिक भास्कर समूहाच्या मालमत्तांवर छापे मारले हाेते.

नवी दिल्ली : दैनिक भास्कर समूहावर टाकलेल्या छाप्यांमध्ये प्राप्तिकर खात्याला २२०० काेटी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळले आहेत. याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे. 

प्राप्तिकर खात्याने २२ जुलैला भाेपाळ, नवी दिल्ली, इंदूर, अहमदाबाद आणि मुंबईसह ४० ठिकाणी दैनिक भास्कर समूहाच्या मालमत्तांवर छापे मारले हाेते. त्याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने माहिती दिली. कारवाईदरम्यान माेठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहारांची माहिती व नाेंदी आढळल्या आहेत. त्यांचा तपास करण्यात येत असल्याचे ‘सीबीडीटी’ने सांगितले. ‘सीबीडीटी’ने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये व्यापार आणि आर्थिक व्यवहारांचे संशयास्पद चक्र आढळले असून ही रक्कम २२०० काेटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती ‘सीबीडीटी’ने दिली. 

हे सर्व व्यवहार संशयास्पद आहेत. प्रत्यक्षपणे काेणताही व्यापार किंवा सामानाची पाेच झालेली नाही. या व्यवहारांमधून किती करचाेरी करण्यात आली आहे तसेच इतर संबंधित कायद्यांच्या उल्लंघनाचाही तपास करण्यात येत आहे.  रिअल इस्टेट व्यवसायातही माेठ्या प्रमाणात गैरव्यवहार आढळला आहे. अनेक मालमत्तांची विक्री राेख व्यवहाराद्वारे करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.अधिकृत निवेदनामध्ये ‘सीबीडीटी’ने समूहाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, प्रसार माध्यम, उर्जा, वस्त्राेद्याेग, रिअल इस्टेट इत्या क्षेत्रातील हा समूह असून वार्षिक ६ हजार काेटी रुपयांची उलाढाल असल्याची माहिती ‘सीबीडीटी’ने दिली. या ७०० काेटी रुपयांपैकी ४०८ काेटी रुपये एका सहकंपनीला कर्जाच्या नावाखाली वळते केले. त्यासाठी केवळ १ टक्के व्याज दाखविण्यात आले आहेत.

कर्मचारी, नातेवाईक बेनामी कंपन्यांचे संचालकसमूहाच्या १०० हून अधिक कंपन्या आहेत. त्यात हाेल्डिंग कंपन्यांसह उपकंपन्यादेखील आहेत. बनावट व्यवहारांसाठी या कंपन्या नातेवाईक तसेच कर्मचाऱ्यांच्या नावावर उघडण्यात आल्याचा खुलासादेखील ‘सीबीडीटी’ने केला. अनेक कर्मचारी या कंपन्यांमध्ये संचालक आणि समभागधारक असल्याचे दाखविण्यात आले आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती नाही. मात्र, आपले आधारकार्ड आणि डिजिटल स्वाक्षऱ्या माेठ्या विश्वासाने दिल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या माध्यमातून समूहाने बेनामी कंपन्याच्या माध्यमातून ७०० काेटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न लपविल्याचा संशय आहे. ही रक्कम आणखी माेठी असू शकते.