शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
5
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
6
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
7
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
8
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
9
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
10
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
11
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
12
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
13
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
14
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
15
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
16
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
17
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
18
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
19
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
20
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

कुख्यात फरार गुंड चिन्मय शिंदे जेरबंद; कासारवडवली पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 9:20 PM

27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या आणखीही इतर फरार साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे - घोडबंदर रोड भागातील कुख्यात गुंड चिन्मय शिंदे याला कासारवडवली पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याला 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.घोडबंदर रोड येथील एक रहिवाशी हिरानंदानी इस्टेट येथील ‘द वॉक’ येथे 6 एप्रिल 2019 रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास आले होते. त्यावेळी कुख्यात गुंड शिंदे याने त्याच्या अन्य साथीदारांसह या रहिवाशांवर चॉपरने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर हे टोळके तिथून पसार झाले होते. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कासारवडवली पोलिसांनी यातील प्रसाद पालांडे, राजकुमार यादव आणि कृष्णा कांबळे यांना तात्काळ अटक केली होती. या घटनेनतर चिन्मय मात्र पसार झाला होता. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक रहिवाशांमध्ये त्याची दहशत होती. तो घोडबंदर परिसरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने त्याला 22 सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्या आणखीही इतर फरार साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :ArrestअटकthaneठाणेPoliceपोलिस