शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

Video : ७५ रुपयांसाठी "अबोली" रिक्षाचालकाला मारहाण; मीटरप्रमाणे भाडे सांगितल्याने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 21:53 IST

Crime News : याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई - मीटर प्रमाणे झालेले भाडे नाकारत चौघा प्रवास्यांनी महिला रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघा व्यक्तींनी सीबीडी ते नेरुळपर्यंत प्रवास करून मीटर प्रमाणे झालेले भाडे देण्यास नकार देत हा प्रकार केला. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेलापूर येथे राहणाऱ्या "अबोली" रिक्षाचालक सविता बेले यांच्यासोबत मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सविता घ्या सीबीडी येथे रिक्षा स्टॅण्डवर असताना त्यांच्याकडे नेरुळला जाण्यासाठी चौघेजण आले होते. परंतु रिक्षात तिघांच्या वर चौथा प्रवासी घेणार नसल्याचे सविता यांनी त्यांना सांगितले. परंतु आपण एकाच कुटुंबातले असून एकासाठी वेगळी रिक्षा करावी लागेल अशी गयावया करून ते रिक्षात बसले. त्यामध्ये एका पुरुष व महिलेसह त्यांच्या मुलगा व मुलीचा समावेश होता. नेरुळ सेक्टर 10 येथे पोचल्यावर सविता यांनी त्यांना मीटर प्रमाणे 75 रुपये भाडे झाल्याचे सांगितले. परंतु आपण नेहमी 50 रुपयात येतो असे बोलत त्यांनी अबोली सोबत वाद घालण्यास सुरवात केली. त्याचवेळी त्या कुटुंबातील मुलीने रिक्षाची चावी काढून घेतली असा सविता यांनी तिला विरोध केला. यावरून चौघांनी मिळून आपल्याला मारहाण केल्याचा सविता यांचा आरोप आहे. तर भररस्त्यात आपल्याला मारहाण होत असताना काही महिला व पुरुष मदतीला धावून आले असता त्यांनाही चौघांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. अखेर रात्री त्यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार नेरुळ पोलिसांकडे केली असता एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु चौघांवरही गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

चौघांकडून मारहाण होत असताना आपण अनेकदा 100 नंबरवर फोन करून पोलीसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन उचलला गेला नाही व त्यामुळे आपल्याला वेळेवर मदत न मिळू शकल्याचा देखील संताप सविता बेले यांनी केला आहे.महिला रिक्षाचालकाला झालेल्या या मारहाणीचा निषेध अबोली रिक्षाचालक महिलांकडून व्यक्त होत आहे. या घटनेतील सर्व दोषींवर कारवाई करण्याची देखील मागणी अबोली रिक्षा चालक संघटनेच्या उपाध्यक्ष अंजना शिंदे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षाNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस