शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; 'फोन -पे' मुळे छडा, आरोपी जेरबंद

By नरेश डोंगरे | Updated: June 6, 2024 21:46 IST

बाळ चोरणारे सराईत असण्याचा संशय : १२ तासांत आरोपी तेलंगणात पोहचले

नागपूर : रेल्वे स्थानकावरून ज्या पद्धतीने बंटीबबलीने सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. त्यावरून ते दोघे बाळ चोरणारे सराईत गुन्हेगार असावे, असा संशय आतापर्यंतच्या घटनाक्रमातून पुढे आला आहे. चिमुकला नजरेस पडताक्षणीच त्या दोघांनी त्याचे अपहरण करण्याचा कट रचला असावा, असाही संशय आहे.

अपहृत बाळाची आई भिक मागते. ती मुळची मध्य प्रदेशातील आहे. तिच्यासोबत पतीसारखा राहणारा तरुण वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून तो नागपुरात मिळेल ते काम करतो अन् काम नाही मिळाले तर भीक मागून खातो. दोन वर्षांपूर्वी हे दोघे एकमेकांना दिसले अन् ते नंतर पती-पत्नीसारखे एकमेकांसोबत राहू लागले. मिळेल ते खायचे. कधी ताजबाग, कधी रेल्वे स्थानक तर कधी कुठेही जागा मिळेल, तेथे झोपायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे.

बुधवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास भिक मागणारी तरुणी आरोपी बंटी-बबलीजवळ आली. तिने पाच-दहा रुपये द्या, असे म्हटले. तिच्या कशित चिमुकला पहूडला असल्याचे दिसताच बंटी-बबलीने त्याच्या अपहरणाचा कट रचला. महिला आणि तिच्या पतीला विश्वासात घेत खाऊ-पिऊ घातले. त्यांना चांगला रोजगार देण्याचे आमिष दाखवले. आम्ही दोघे प्रेमविवाह करण्यासाठी घरून पळून आलो. तुमच्यासोबत आज राहू, असे म्हणत तुम्ही कुठे राहता, अशी विचारणा केली. आमचे काही घर नाही, जागा मिळाली तेथे झोपतो, असे भिक्षेकरी दाम्पत्याने म्हणताच या बंटी-बबलीने त्यांना सायंकाळच्या गाडीने शेगावला दर्शनाला जाऊ, असे म्हटले. गाडीला वेळ असेपर्यंत रेल्वे स्थानकावर राहू, असेही म्हटले. नंतर आरोपी महिला बाळाच्या आईला घेऊन रेल्वे स्थानकावर आली. तर, चिमुकल्याच्या पित्याला घेऊन आरोपी तरुण गणेशपेठमधील बारमध्ये गेला. तेथे त्याला आरोपीने यथेच्छ दारू पाजली. ५६० रुपयांचे 'दारूचे बील आरोपीने फोन-पे ने चुकते' केले. रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सेवाग्राम एक्सप्रेसची शेगावला जाण्यासाठी चार तिकिट काढली.

प्लान ए फसल्याने, प्लान बी अंमलातशेगावला जाईपर्यंत जेथे संधी मिळेल तेथे चिमुकल्याला घेऊन पळायचे, असा आरोपीचा कट होता. मात्र, रेल्वेगाडीत चढल्यानंतर किरकोळ कारणावरून बाळाच्या आईवडिलांत कडाक्यात भांडण झाले. त्यामुळे ती रागात गाडीखाली उतरली अन् आपण कुठेही येणार नाही, असे तिने म्हटले. त्यामुळे बाळाच्या पित्यासह आरोपीही खाली उतरले. आरोपींचा प्लॅन ए फसला. बाळाचे आईवडील पहाटे २ वाजेपर्यंत फलाटावर भांडत होते. त्यांनी या दोघांना कसेबसे शांत केले आणि ते गाढ झोपेत असताना आरोपी महिलेने पहाटे ४.१५ला चिमकल्याला उचलून घेत फलाटावरून पळ काढला. ऑटोने राजीवनगर आणि तेथून आरोपींनी टॅक्सी करून वर्धा मार्गे तेलंगणातील मंचेरिया गाठले. एकूणच घटनाक्रमावरून आरोपी मुले चोरणारे सराईत गुन्हेगार असावे, असा तर्क आहे. एकूणच घटनाक्रमावरून आरोपी मुले चोरणारे सराईत गुन्हेगार असावे, असा तर्क आहे.

'फोन -पे' मुळे छडा, आरोपी तेलंगणात जेरबंदअपहरणाची तक्रार मिळताच पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, ठाणेदार मनीषा काशिद यांनी बाळाच्या आईवडिलांना खोदून खोदून माहिती विचारली. त्यात बियरबारमध्ये दारूचे बील आरोपीने फोन -पे ने चुकता केल्याची माहिती पुढे आली. हाच धागा पकडून बारमधून आरोपीचा मोबाईलनंबर शोधला. गुरुवारी त्याचे लोकेशन तेलंगणातील मंचेरियात असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे तेथे पथक पाठवून मंचेरिया पोलिसांच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी आज रात्री त्याच्या मुसक्या बांधल्या. त्यांना घेऊन शुक्रवारी सकाळपर्यंत पोलीस नागपुरात पोहचणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी