शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

चार लाखांच्या कर्जासाठी केले  ठाण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण; हॉकी स्टिकने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 07:51 IST

कुटुंबीयांनाही ठार मारण्याची दिली धमकी; तिघांना अटक 

ठाणे : चार लाखांच्या कर्जावरील व्याजाच्या वसुलीसाठी ठाण्यातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला एका खोलीत डांबून ठेवले होते. तिथेच वायर आणि हॉकी स्टिकने त्याला जबर मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी बाबा ऊर्फ रमजान शेख याच्यासह तिघांना गुरुवारी अटक केली आहे.

चरईतील मिष्टान्नाचे विक्रेते राजेश भगलानी (३९) यांनी व्यवसायात तोटा झाल्याने बाबा ऊर्फ रमजान शेख (रा. हाजुरी, ठाणे) यांच्याकडून चार लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याबदल्यात चार हजार रुपये रोज देण्याचे ठरले. मात्र, रमजान यांनी त्यांच्याकडून आठ लाख रुपये घेतल्याचे नोटरीवर लेखी घेतले. त्यानंतर ८० दिवस रमजान यांना त्यांनी रोज चार हजार रुपये दिले. पुढे त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे त्यांनी ते पैसे देणे बंद केले. पैसे देणे बंद केल्यामुळे रमजान याने मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी २३ डिसेंबर २०२० रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल केला. त्यानंतरही त्याने पैसे मागण्यास सुरुवात केली. २३ मार्च २०२१ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास राजेश हे त्यांच्या जांभळीनाका येथील दुकानात असताना त्यांचा मित्र विक्रांत ऊर्फ वाल्मीकी उमेर यास ताब्यात घेऊन त्याच्या मार्फत रमजान याने वागळे इस्टेट येथील गोपाळआश्रम हॉटेल येथे बोलवून घेतले.

तिथे त्याच्या मोटारकारमधून नजीर शेख, शाहरुख शेख आणि खाजा शेख आदींनी राजेश यांना गाडीत कोंबून हाजुरीतील एका खोलीत डांबून ठेवले. तिथे पैशांची मागणी करून वायर आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचीही धमकी दिली. तेथून सुटका करून घेतल्यानंतर याप्रकरणी २४ मार्च रोजी राजेश यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीया घटनेमुळे ठाणे शहर आणि परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. .

आरोपींना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी  याप्रकरणी सावकारी कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या पथकाने २५ मार्च रोजी रमजान, नजीर आणि शाहरुख या तिघांना अटक केली. त्यांना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Kidnappingअपहरण