शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

पळवून नेलेली मुलगी अखेर पोलिसांच्या ताब्यात; झांशी रेल्वे स्थानकात सापडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 6:04 AM

२१ जानेवारी रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याबाबत तिच्या पालकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाणे : मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना झांशी रेल्वेस्थानकात फिरोजपूर एक्स्प्रेसमधून अपहृत मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलीस मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

२१ जानेवारी रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याबाबत तिच्या पालकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार अल्पवयीन अपहृत मुलीचा व अज्ञात आरोपीचा शोध गुन्हे शाखा, घटक-१ करीत असताना पोलीस हवालदार आबुतालीब शेख यांना अपहृत मुलगी ही फिरोजपूर ए दिल्ली येथे जात असल्याची माहिती मिळाली. तिला फूस लावून पळवून नेणारा इसम हा सदर मुलीला दिल्ली येथे भेटणार असल्याची माहिती मिळाली.  या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा घटक- १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू करण्यात आले.

पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांनी झांशी रेल्वे पोलीस ठाणे इन्चार्ज सुनीलकुमार सिंग यांना घटनेची माहिती देत, अपहृत मुलीचा गाडीमध्ये शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड व पथक झांशी येथे रवाना करण्यात आले. झांशी रेल्वे पोलीस ठाण्याचे सुनीलकुमार सिंग व त्यांच्या पथकाने फिरोजपूर एक्स्प्रेस ट्रेन झांशी रेल्वेस्थानक येथे २२ जानेवारी रोजी थांबवून अपहृत मुलीस ताब्यात घेतले.

टॅग्स :Policeपोलिस