शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

अपहृत चार वर्षाचा चिमुकला अहमदनगरमध्ये सुखरूप; आजीकडे संशयाची सुई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 21:23 IST

Abducted : महिलेसह पाच जणांना अटक, अहमदनगर गुन्हे शाखा, राजापेठ पोलिसांची संयुक्त कारवाई

ठळक मुद्दे अन्य एक आरोपी आसिफ हिनायत शेख (२४, रा. कोठला, अहमदनगर) याच्या शेवगाव (जि. अहमदनगर) याच्या घरी अपहृत चिमुकल्याला ठेवल्याची प्राथमिक माहिती गुन्हे शाखा व राजापेठ पोलिसांना मिळाली होती. दोन्ही पथके त्याच्या घरी धडकली.

अमरावती : शारदानगरमधून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय मुलाचा राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अहमदनगर येथे कल्याण मार्गावरून ताबा घेतला. अहमदनगरपोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने याप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींसह या चिमुकल्याला शनिवारी शहरात आणले जाईल. मुलाच्या अपहरणाने सैरभैर झालेल्या आई-वडिलांना तो सुखरूप असल्याच्या बातमीने दिलासा मिळाला. आता त्याच्या वाटेकडे त्यांचे लक्ष लागले आहे.पोलीस सूत्रांनुसार, हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५, रा. फलटण चौकीजवळ, कोठला, अहमदनगर), अलमस ताहीर शेख (१८, रा. कोठला, अहमदनगर), मुसाहीब नासीर शेख (२१, रा. मुकुंदनगर, अहमदनगर), फैरोज रशीद शेख (२५, रा. कोठला, अहमदनगर) अशा चौघांना जणांना अपहरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अमरावती शहरातून मुलाचे अपहरण झाल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी माहिती दिली. त्यांच्या आदेशावरून तेथील अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आगरवाल तसेच पोलीस निरीक्षक अनिल कटके, एपीआय मिथून घुगे, पीएसआय गणेश इंगळे यांच्यासह गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी राजापेठ पोलिसांना सहकार्य केले.

अन्य एक आरोपी आसिफ हिनायत शेख (२४, रा. कोठला, अहमदनगर) याच्या शेवगाव (जि. अहमदनगर) याच्या घरी अपहृत चिमुकल्याला ठेवल्याची प्राथमिक माहिती गुन्हे शाखा व राजापेठ पोलिसांना मिळाली होती. दोन्ही पथके त्याच्या घरी धडकली. पोलीस आल्याची माहिती मिळताच तो पळून गेला.दरम्यान, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी इतर दोघांकडे चिमुकला असल्याची माहिती दिली. त्यावरून कल्याण मार्गावर सापळा रचण्यात आला. या मार्गाने दुचाकीने मुलांना घेऊन जात असताना आसिफ हिनायत शेख व फैरोज रशीद शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव, राजापेठचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्यासह राजापेठ पोलिसांच्या चार व  गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी या घटनेचा छडा लावला.आजीवर संशयाची सुईचिमुकल्याचे अपहरण झाले तेव्हा त्याच्यासोबत आजी होती. त्यामुळे गुरुवारी त्यांचे बयाण नोंदवून शुक्रवारी सकाळपासून कसून चौकशी केली. आरोपी हिनाला ती ओळखत असल्याचे तसेच तिचेही माहेर अहमदनगर पुढे आले. त्यामुळे अपहरणामध्ये आजीचा तर सहभाग नाही ना, यादृष्टीने आता पोलीस तपास करीत आहेत. 

अहमदनगर शहरातून चार आरोपींना ताब्यात घेतले. यात अपहरण करणाऱ्या दोन आरोपींचाही समावेश आहे. खंडणीसाठी अपहरण केले असावा, त्या दिशेने तपास सुरू आहे. मुलाच्या आजीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.आरती सिंह, पोलीस आयुक्त

टॅग्स :KidnappingअपहरणAhmednagarअहमदनगरAmravatiअमरावतीPoliceपोलिसArrestअटक