शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बेटू Love You काश! मी अखेरचं तुम्हाला भेटलो असतो; ३ मुलांच्या वडिलांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:49 IST

सोनू अडीच वर्षांपासून परदेशात राहत होता. या काळात त्याने घरातील कोणत्याही सदस्याला फोन केला नाही. मृत युवकाला एक मुलगा व दोन मुली आहेत असं त्याचे वडील म्हणाले.

बांदा - उत्तर प्रदेशातील बांदा येथे आयुष्याला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या क्रमांकावरून कुटुंबीयांना माहिती दिली. आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला.

घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मृत व्यक्तीने लिहिले आहे की, माझ्या आई वडिलांना धीर द्या. मी गेल्या १६ दिवसांपासून मानसिक तणावाखाली जीवन जगतोय. मला सगळ्यांची खूप आठवण येत आहे. ती स्त्री (म्हणजे पत्नी) माझ्यासोबत गेली नाही यावर तुमचा आणि समाजातील लोकांचा आता विश्वास बसेल असं त्याने लिहिलंय. त्याचसोबत मुलासाठी तो भावूक झालेला दिसून आला.''माझ्या प्रिय मुला, मला माफ कर. मी तुझ्यावर प्रेम करतो. आई आणि बाबांची काळजी घे. खूप आठवण येतेय. काश! मी तुला शेवटच्या वेळी भेटू शकलो असतो असे वाटले असते. कधीही जुगार खेळू नका, जुगाराने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे असं त्याने मुलाला सांगितले. 

सोम प्रकाश उर्फ ​​सोनू हा युवक फतेहपूर जिल्ह्यातील लालौली पोलीस स्टेशन हद्दीतील दतौली गावचा रहिवासी होता. त्याने मंगळवारी शहरातील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. त्यानंतर बुधवारी तो न दिसल्याने हॉटेल मालकाला संशय आला. त्याने दरवाजा ठोठावला पण काहीच हालचाल झाली नाही. त्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी दरवाजा उघडला असता सोनूचा मृतदेह बेडशीटच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

सोनू अडीच वर्षांपासून परदेशात राहत होता. या काळात त्याने घरातील कोणत्याही सदस्याला फोन केला नाही. मृत युवकाला एक मुलगा व दोन मुली आहेत असं त्याचे वडील म्हणाले. दरम्यान, सोम प्रकाश उर्फ ​​सोनू सिंग (वय 36) रा. दतौली, फतेहपूर हा एका हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले असता त्याच्या रुमचा दरवाजा बंद होता. युवकाने चादरीच्या सहाय्याने पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून नंबर काढून त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कारवाई करण्यात येत आहे असं डीएसपी सिटी गवेंद्र पाल गौतम यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी