शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या, एक महिन्यानंतर गुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:12 IST

कळंबोली येथून वैष्णवी बाबर (१९) ही १२ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी नोंद केली.

नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना एक महिन्यानंतर उघडकीस आली असून, गुन्हे शाखेच्या पथकांनी पाच दिवस खारघर टेकडीत शोधमोहीम राबवून तरुणीचा छिन्न विछिन्न मृतदेह दरीतून बाहेर काढला. 

कळंबोली येथून वैष्णवी बाबर (१९) ही १२ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी नोंद केली. तिचा शोध लागत नसल्याने प्रकरण गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता वैष्णवी एका तरुणासोबत खारघरमध्ये दिसली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तरुणाचा शोध घेतला असता त्याने १२ डिसेंबर रोजी खारघर स्थानकालगत रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले. 

तपासादरम्यान गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती तरुणाचा मोबाईल लागला. त्यामुळे वैष्णवी व त्याचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. खारघर टेकडी परिसरात तिला घेऊन गेल्यामुळे तिच्यासोबत विपरीत काही घडले असावे, असा अंदाज व्यक्त करून तिचा मृतदेह शोधून काढला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी