शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"पती, दिराला कायमचा संपवला, मृतदेह उचला.."; बंदूक घेऊन महिला आली पोलिसांना शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 11:45 IST

ही घटना उज्जैनच्या जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी अंतरावरील इंगोरिया गावात घडली. मृ

मध्य प्रदेशातील उज्जैन इथं प्रॉपर्टीच्या वादातून एका महिलेने पती आणि दिराची गोळी मारून हत्या केली. त्यानंतर आरोपी महिलेने पिस्तुलासह पोलीस स्टेशन गाठत आत्मसर्मपण केले. पती आणि दिराला संपवलं, मृतदेह उचला असं म्हणत आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले. हातात पिस्तुल पकडत महिलेने तिचा गुन्हा पोलिसांसमोर कबुल केला त्यावेळी समोरील खुर्चीत बसलेले पोलीस ताडकन् उभे राहिले. 

ही घटना उज्जैनच्या जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी अंतरावरील इंगोरिया गावात घडली. मृतकाची ओळख आरोपी सविताचा पती राधेश्याम आणि दीर दिनेश नावानं झाली. इंगोरिया पोलीस अधिकारी चंद्रिका सिंह यांनी सांगितले की, राधेश्याम यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला. तर दिनेश यांना गोळी लागल्यावर बडनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी उपचारावेळी दिनेश यांनी प्राण सोडले. त्यानंतर आरोपी महिला बंदुकीसह पोलिसांना शरण आली. सविता अंगणवाडी सेविका असून तिने पती आणि दिराला गोळी मारली. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण संपत्तीवरून झालेल्या वादातून घडले असं समोर आले आहे.

५ कोटी जमीन वादया प्रकरणी आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, फोरलेन हायवेवरील ५ कोटी किंमतीची जमीन दिराला हडपायची होती. माझा पती राधेश्याम व्यसन करायचा. दिराच्या सांगण्यावरून पती दररोज मला मारहाण करायचा. सोमवारी सकाळी पती शिवीगाळ करत होता. त्या रागात मी बेडखालची पिस्तुल काढली आणि आधी दिराला गोळ्या झाडल्या त्यानंतर पतीलाही मारून टाकले. रोजच्या मारहाणीमुळे आणि हिंसेमुळे हे पाऊल उचलल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्याशिवाय माझ्या २ मुली आणि एका मुलाच्या भविष्यासाठी मी या दोघांना मारले असंही महिला पोलिसांना म्हणाली. 

बंदूक कुठून आणली?अनेकांनी या हत्याकांडावर प्रश्न उभे केले. मृत व्यक्तीचे वडील आणि आरोपी महिलेच्या सासऱ्यांनी म्हटलं की, दिनेश आणि राधेश्याम या दोन्ही भावांमध्ये जमिनीचे वाटप आधीपासून होते मग वाद कशामुळे झाला? अखेर घरात बंदूक कुणी आणली? या सर्व गोष्टीची शहानिशा करून आरोपी सूनेला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तर घरगुती आणि संपत्तीच्या वादातून महिलेने रागाच्या भरात हे कृत्य केले. त्यानतर महिलेने पोलीस स्टेशनला येऊन शरणागती पत्करली. परंतु पोलीस या घटनेत आणखी तपास करत असून सर्व अँगलचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी