शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या पैशांवर डोळा, FB वर युवकासोबत लफडं; पत्नीने रचलं षडयंत्र, पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 17:55 IST

पोलिसांचा संशय वाढला, मृत व्यक्तीच्या कुटुंबानेही ऋचावर आरोप केले. जेव्हा पोलिसांनी ऋचाला ताब्यात घेतले तेव्हा प्रियकर दिपेशबाबतही माहिती हाती लागली

विदिशा – मध्य प्रदेशातील विदिशा इथं हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. याठिकाणी एका महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला आहे. पतीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला. या कामासाठी महिलेने २ अन्य लोकांना ५० हजारांची सुपारी दिली होती. हत्येतील आरोपी एका मुलाची आई आहे. फेसबुकच्या माध्यमातून ती प्रियकराला भेटली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि ३ जणांना अटक केली आहे.

विदिशाच्या शमशाबाद इथं २३ फेब्रुवारीला पोलिसांना जंगलात एक मृतदेह सापडल्याची बातमी मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. तपासानंतर हा मृतदेह अशोक नगरमध्ये राहणाऱ्या सौरभ जैन यांचा असल्याचे कळाले. त्यानंतर शमशाबाद पोलिसांनी अशोक नगर पोलिसांशी संपर्क साधत पुढील तपास केला. चौकशी करता करता पोलिसांना एक पुरावा हाती लागला. त्यानंतर सौरभची पत्नी ऋचा जैनचे अफेअर असल्याचे समोर आले.

पोलिसांचा संशय वाढला, मृत व्यक्तीच्या कुटुंबानेही ऋचावर आरोप केले. जेव्हा पोलिसांनी ऋचाला ताब्यात घेतले तेव्हा प्रियकर दिपेशबाबतही माहिती हाती लागली. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली असता हत्येचा खुलासा झाला. दोघांनी पोलिसांसमोर हत्येचा कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, ऋचानं फेसबुकच्या माध्यमातून एका युवकाशी ओळख केली होती. या ओळखीचे रुपांत प्रेमात झाले. त्यानंतर ऋचा आणि पती सौरभ यांच्या नात्यात वाद वाढू लागले. त्यांच्यातील भांडणामुळे दुरावा आला. सौरभला ऋचावर संशय आला होता. त्यामुळे ऋचाने त्याला रस्त्यातून बाजूला सारण्याचे षडयंत्र रचले.

सौरभच्या पैशांवर ऋचाची नजर होती. एकेदिवशी तिने प्रियकरसोबत मिळून सौरभच्या हत्येची ५० हजारांत सुपारी दिली. उपचाराच्या बहाण्याने तिने सौरभला भोपाळला घेऊन निघाली. रस्त्यात प्रियकर आणि सुपारी किलर्सने मिळून सौरभच्या डोक्यावर दगड मारून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कोलुआच्या जंगलात फेकून दिला. आता या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी