शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुजाऱ्यासोबत पत्नीचे संबंध, पतीच्या हत्येचा कट रचला; एक डाव उलटला अन् प्लॅन फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 18:28 IST

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बस्ती - उत्तर प्रदेशच्या बस्ती इथं हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. १० एप्रिल रोजी किठिउरी रेल्वे क्रॉसिंगजवळ एक व्यक्ती गंभीर अवस्थेत पटरीवर संशयास्पदरित्या सापडला होता. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. मृतकाची ओळख धर्मराज नावाने झाली. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराजची हत्या फिल्मी स्टाईलने करण्यात आली होती. मृतकाच्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून दगडाने पतीला बेदम मारले. इतकी मारहाण केली तो बेशुद्ध पडला. त्याचाच फायदा घेत या दोघांनी मिळून त्याला रेल्वे रुळावर फेकून दिले. जेणेकरून ही हत्या नसून आत्महत्या आहे असे लोकांना वाटावे. 

परंतु आरोपींचा प्लॅन फसला, रुळावर फेकलेल्या व्यक्तीचे ट्रेन आल्यावर हात कापले गेले परंतु तो बचावला. रेल्वे ट्रॅकवर तडफडत असलेल्या व्यक्तीचा आवाज ऐकून स्थानिक धावत आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गंभीर अवस्थेत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने हॉस्पिटलला पाठवले. त्याठिकाणी उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला त्यानंतर तपासाला सुरुवात केली. तपासावेळी एक एक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आणि हैराण करणारे सत्य समोर आले. 

पुजाऱ्यासोबत महिलेचे होते अनैतिक संबंधतपासात मृत धर्मराजची पत्नी आणि मंदिरातील पुजारी यांच्यात अफेअर सुरू असल्याचे समोर आले. ही बाब पतीला समजली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने पुजाऱ्यासोबत मिळून धर्मराजचा काटा काढण्याचं ठरवले. धर्मराज गावाबाहेर कामाला जायचा. तर पत्नी पूजा करण्याच्या निमित्ताने मंदिरात जायची. त्यावेळी पुजाऱ्यासोबत तिचे सुत जुळले. धर्मराजला हे समजल्यानंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. त्यानंतर प्लॅन रचून महिला आणि प्रियकर पुजाऱ्याने धर्मराजची हत्या करण्याचं निश्चित केले. 

पोलिसांनी केली तिघांना अटकपोलिसांनी या गुन्ह्यात पुजारी गुड्डू, प्रेयसी मीरा आणि तिच्या बहिणीच्या नवऱ्याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात महिला आणि पुजाऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत महिला, प्रियकर पुजारी आणि त्याचा साडू याला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी