शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालसुधारगृहातून पळालेल्या विधीसंघर्षग्रस्तांचा धूमाकुळ; पोलिस शिपायाला केले जखमी

By दयानंद पाईकराव | Updated: December 27, 2023 23:45 IST

ऑटोचालकाला लुटले, गोंदियात पोलिस व्हॅनची तोडफोड

नागपूर : पाटनकर चौकातील बालसुधारगृहातून पळून गेलेल्या ६ विधीसंघर्षग्रस्त बालकांनी मागील तीन दिवसांपासून नागपूर आणि गोंदियात धुमाकुळ घातला आहे. त्यांनी गोंदिया आणि नागपुरात पोलिसांवरच हल्ला चढविला. बुधवारी रात्री त्यांनी केलेल्या हल्ल्यात सिताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सुशांत वाडिया जखमी झाला. दरम्यान यातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकास सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर फरार आहेत.

रविवारी २४ डिसेंबरला सकाळी पाटनकर चौकातील बालसुधारगृहातून सहा विधीसंघर्षग्रस्त बालक सुरक्षा रक्षकावर हल्ला करून फरार झाले होते. पोलिसांनी शोध घेऊनही त्यांचा सुगावा लागला नाही. बालसुधारगृहातून पळून गेल्यानंतर २४ डिसेंबरला सायंकाळी सात वाजता त्यातील चार जण विद्यापीठ लायब्ररी चौकातून अंबाझरी मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी भीमराव काशीनाथ वाढवे (वय ५५, रा. पन्नासे ले आऊट स्वावलंबीनगर) यांच्या आॅटोत बसले. परंतु बजाजनगरच्या कब कॅफेसमोर त्यांनी आॅटो थांबवून आॅटोचालकाला मारहाण करीत त्याच्याकडील रक्कम लुटून आॅटो घेऊन पळ काढला होता. त्यानंतर ते २५ डिसेंबरला गोंदियाला गेले. २६ डिसेंबरला ते गोंदियात आॅटोने फिरत असताना त्यांचा आॅटो उलटला. घटनास्थळी पोलिसांना कारवाई करताना पाहून त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. तेथून बुधवारी सकाळी ते रेल्वेने नागपुरात आले. त्यानंतर तीन-तीनच्या गटात वेगळे होऊन शहरात फिरत होते. त्यातील तीघे रात्री ८ वाजता सिताबर्डी परिसरात आले.

इटर्निटी मॉलच्या मागील मार्गावर त्यांनी एका तृतीयपंथीयाला जखमी करून लुटले. तृतीयपंथीयाची अ‍ॅक्टीव्हा गाडी घेऊन ते फरार झाले. यावेळी परिसरात गस्त घालत असलेले सिताबर्डी ठाण्याचे विनोद तिवारी आपल्या सहकाºयांसोबत तेथून जात असताना तृतीयपंथीयाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. तिवारी आणि त्यांचे सहकारी त्वरीत विधीसंघर्षगस्त बालक गेलेल्या दिशेने गेले असता मुंजे चौकात विधीसंघर्षग्रस्त बालक आढळले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चाकु काढून पोलिसांवर हल्ला केला. यात सुशांत वाडिया या पोलिसाला त्यांनी जखमी केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. त्यातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्यापही पाच जण फरार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस