शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरी रातों में, सुनसान राहों पर...चोर नग्न फिरायचा, अंगावर तेल लावून करायचा चोरी! अखेर असा जाळ्यात अडकला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 11:18 IST

रात्रीच्या अंधारात तो निर्वस्त्र होऊन रस्त्यावर फिरायचा. अंगाला तेल लावून चालायचा आणि चोरी करायचा.

नवी मुंबई-

रात्रीच्या अंधारात तो निर्वस्त्र होऊन रस्त्यावर फिरायचा. अंगाला तेल लावून चालायचा आणि चोरी करायचा. मुंबईच्या जवळ असलेल्या असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिघा परिसरात नग्न चोराची दहशत हळूहळू वाढू लागली होती. निर्वस्त्र होऊन तो फिरायचा यामुळे नागरिकांमध्ये आधीच घबराट होती आणि आपल्याला कुणी पकडू नये किंवा पकडलं तर लगेच निसटता यावं यासाठी तो अंगावर तेल लावून फिरायचा. पण पापाचा घडा कधीना कधी भरतोच असं म्हणतात. अखेर नवी मुंबईतील कळवा परिसरात राहणारा हा चोरटा अखेर पकडला गेला आहे.

रात्री उशिरा आणि पहाटे मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या या चोरट्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कारवाईची तयारी केली. नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्याला पकडण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिघा परिसरातील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसला. गेल्या चार दिवसांपासून हा व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, त्यांच्या मनात घबराट पसरली. आपल्या जवळ कुणी येऊ नये यासाठी तो नग्न अवस्थेत फिरायचा. त्याची दहशत वाढत होती. त्यानंतर पोलिसांनी रात्री संबंधित परिसरात सापळा रचून चोराला पकडलं. कळवा भागातील या २४ वर्षीय चोरट्याला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीला डेंग्युची लागणपोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून त्याची ओळख पटवून त्याला रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले. चौकशीत कळवा ठाण्यात पकडलेल्या चोरट्यावर यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. मात्र रबाळे पोलिस त्याच्यावर कोणाचीही नोंद करण्यापूर्वीच त्याला डेंग्यू झाला. अशा स्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तो बरा झाल्यानंतर पोलीस त्याची चौकशी करणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई