शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; तलासरीत क्रूरतेचा कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तलासरी : तालुक्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या झाल्याची क्रूर घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : तालुक्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या झाल्याची क्रूर घटना उघड झाली आहे.  आरोपीने मुलीचा मृतदेह गुजरातमध्ये नेऊन टाकल्याची कबुली दिली आहे. 

आरोपी रमेश डाह्या दुबळा (वय ४५, रा. डोंगारी दुबलपाडा) याने बुधवारी संजना शांतू कान्हात (वय १०) हिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केली. ही घटना तलासरी तालुक्यात डोंगारी येथे घडली. तलासरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उपलब्ध माहिती आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे दुबळा याला अटक केली. दुबळा मुलीच्या शेजारी राहतो. घरगुती वादातून तिची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. मच्छीमार बोटीवर जाण्यासाठी घेतलेले पैसे व आर्थिक देवाण-घेवाणीवरूनही त्यांचे वाद होते, असे बोलले जात आहे. वाद झाल्याचा राग मनात धरून दुबळा याने संजना बुधवारी सकाळी शाळेत जात असताना शाळेत सोडतो असे  सांगून मोटारसायकलवरून घेऊन गेला, मात्र तिला शाळेत न सोडता १०  ते १५ किलोमीटर लांब गुजरातमध्ये घेऊन  गेला. गुजरातमधील भिलाड-संजण रस्त्यावरील जंगलातील झाडाझुडपात  त्याने तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर गळा दाबून खून केला, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली. 

मुलगी घरी न आल्यामुळे बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नातेवाईक, आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. तलासरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार करण्यात आली होती.

दुबला याने अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून गळा दाबून खून करून मृतदेह जंगलात झाडाझुडपात अडचणीच्या ठिकाणी लपवून ठेवला होता. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तलासरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग