शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीत जाण्यास अडवल्याच्या रागात सुरक्षा सुपरवायझरची हत्या

By मनीषा म्हात्रे | Updated: August 30, 2024 22:33 IST

जिम ट्रेनरला अटक, भांडुपच्या ड्रीम्स सोसायटीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इमारतीत जाण्यास अडविल्याच्या रागात जिम ट्रेनरने सुरक्षा सुपरवायझरची डोके आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना भांडुपच्या ड्रीम्स सोसायटीत घडली. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी जिम ट्रेनर विशाल गावडेला अटक केली आहे. तो गाढव नाका परिसरात राहतो.

या हल्ल्यात शिवाजी बारवे (६०) यांचा मृत्यू झाला आहे. बारवे हे पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत भांडुपच्या टेंभीपाडामध्ये राहण्यास होते. गेल्या पाच वर्षापासून भांडुप पश्चिमेच्या ड्रीम्स सोसायटीत सुरक्षा सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. २७ ऑगस्ट रोजी ते नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीसाठी गेले. गावडे हा लॉकडाऊनचा पूर्वी या इमारतीत ट्रेनर म्हणून काम करत होता. २७ तारखेला दारूच्या नशेत इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठे जायचे? याबाबत विचारताच त्याने काही माहिती न देता आत जाण्याचा प्रयत्न केला. तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला हटकल्याने वाद घालण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी बारवे यांना याबाबत सांगून बोलावून घेतले. बारवे यांनी गेटवर धाव घेत गावडेला अडवले. याच रागात त्याने बारवे यांना पकडुन त्यांचे डोके कठडयावर आपटले. त्यांच्या अन्य सहकाऱ्यानी मध्यस्थी घेत भांडण सोडवले. आरोपीला पकडून, बारवे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची वर्दी मिळताच भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. बारवे यांना पुढील उपचारासाठी के.इ.एम. रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्या डोक्याला सात टाके बसले. तसेच मणक्याला गंभीर दुखापत झाली. आरोपीला गंभीर दुखापतीचा गुन्ह्यात अटक करत त्याची टेबल जामिनावर सुटका करण्यात आली.      उपचारादरम्यान बारवे  यांचा गुरुवारी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा कलमाचा समावेश करत आरोपीला पुन्हा अटक केली आहे. 

आरोपी दारूच्या नशेत...आरोपी पूर्वी ड्रीम्स सोसायटीत जिम ट्रेनर म्हणून कार्यरत होता. त्यानंतर दुसरीकडे कामाला आहे. घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत आधीच्या कामाच्या ठिकाणी काय चालले आहे? हे पाहण्यासाठी त्याने इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्याला अडविल्याच्या रागात हल्ला केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अटकेची कारवाई करत न्यायालयाने त्याला २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिली. रक्ताच्या थारोळ्यात असताना वडिलांचा कॉल...हल्ल्यानंतर वडिलांचा कॉल येताच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा, त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजले. पोलिसांनी हल्ल्यानंतर आरोपीला किरकोळ दुखापतीचे कलम लावून टेबल जामिनावर सोडून दिले. माझे बाबा गेल्यानंतर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात येताच हत्येचा कलमाचा समावेश केला. पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. -  निलेश बारवे, शिवाजी बारवे यांचा मुलगा 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी