शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘उडता पंजाब’ची पुनरावृत्ती, कंटेनरला पोकळ फ्रेम करून दुबईतून मुंबईत हेरॉईनची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 06:30 IST

जेएनपीटीतून ३६२ कोटींचा माल जप्त, कस्टमच्या ताब्यात होता कंटेनर

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री जेएनपीटी बंदर परिसरातून ३६२.५९ कोटी रुपयांचे शु्द्ध रॉईन जप्त केले आहे. दुबईमधून आलेल्या कंटेनरमध्ये हे ड्रग्स लपवले होते. धक्कादायक म्हणजे या कंटेनरचा ताबा कोणीच न घेतल्याने सात महिन्यांपासून तो कस्टमच्या ताब्यात होता. तरीही लपविलेल्या हेरॉईनचा थांगपत्ता न लागल्याने या बंदरातील स्कॅनिंग यंत्रणेचेही बिंग फुटले आहे.

पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलला या ड्रग्सबाबत माहिती मिळाली होती. या पथकाचे अधिकारी कोमलप्रीत सिंग यांनी नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानुसार आयुक्त बिपीनकुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी विशेष पथक तयार केले होते. त्यांनी बुधवारी रात्री जेएनपीटी परिसरात पाहणी करून संशयित कंटेनरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर गुरुवारी सकाळी कस्टमच्या ताब्यातील हा कंटेनर पोलिसांच्या नजरेस पडला. कौशल्यपूर्ण तपासात या कंटेनरमध्ये लपवलेले हेरॉईनचे १६८ पॅकेट आढळून आले.

७२ किलो ५१८ ग्रॅमचे हे ड्रग्स असून, प्रतिकिलो ५ कोटीप्रमाणे त्याची सुमारे ३६२ कोटी ५९ लाख रुपये किमत असल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले. केवळ शंकेच्या आधारे त्यांनी नवी मुंबई पोलिसांची मदत घेऊन शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात हेरॉईनचा साठा जप्त केला.

दुबईतून आला मालहा कंटेनर दुबई येथून आला असून, त्यात मार्बल भरलेले होते. परंतु, डिसेंबरमध्ये तो जेएनपीटीमध्ये येऊनदेखील संबंधितांनी त्याचा ताबा न घेतल्याने तो कस्टमच्या ताब्यात ठेवला होता. यामुळे परदेशातून येणाऱ्या कंटेनरच्या तपासणीची स्कॅनिंग प्रक्रिया फेल ठरल्याचे यावरून दिसून येत आहे. कंटेनर मागवणाऱ्या कंपनीची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, त्याद्वारे ड्रग्स तस्करीत समाविष्ट असलेल्यांचा शोध सुरू असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

दुबार पाहणीत उलगडा

  • संशयास्पद कंटेनर हाती लागला असता त्यामध्ये अफगाणी मार्बल आढळून आले. परंतु, मिळालेली माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी अनेक तास कंटेनरची अंतरबाह्य भागाची पाहणी केली.
  • त्यामध्ये इतर कंटेनरपेक्षा या कंटेनरला बाहेरून वेगळी फ्रेम असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गॅस कटरच्या साहाय्याने फ्रेम कापल्यानंतर त्यात लपवलेले ड्रग्स हाती लागले. 

कंटेनरभोवती बनवली फ्रेमअफगाणी मार्बल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या या कंटेनरच्या चारही बाजूने व दरवाजाला लोखंडी पोकळ फ्रेम तयार केली आहे. त्यामध्ये छोट्या छोट्या पॅकेटमध्ये भरलेले हे हेरॉईन लपवले होते. त्यामुळे कंटेनरची पाहणी करूनदेखील ते नजरेस पडत नव्हते. तर अशा प्रकारे ड्रग्स वाहतुकीसाठीच हा कंटेनर तयार केल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थNavi Mumbaiनवी मुंबईDubaiदुबई