शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ब्यूटी पार्लरमध्ये तयार होण्यासाठी गेली नवरी; पोलीस कॉन्स्टेबलने गोळी झाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:34 IST

आरोपी घटनास्थळावरुन फरार होताना ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याला पकडले. परंतु आरोपीने त्याच्या तावडीतून निसटून पळ काढला

मुंगेर - बिहारच्या मुंगेर इथं ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी लग्नाला तयार होण्यासाठी ब्यूटी पार्लरला गेलेल्या नवरीला पोलीस युवकाने गोळी मारली आहे. त्यानंतर या पोलिसाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोळी लागलेल्या नवरीला जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचं रविवारी लग्न होणार होते. त्यामुळे ती तयार होण्यासाठी ब्यूटी पार्लरला गेली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. युवतीला गोळी मारणारा पोलीस कॉन्स्टेबल हा युवतीचा प्रियकर असल्याचे तपासात समोर आले. प्रेयसीच्या लग्नामुळे प्रियकर पोलीस युवक खूप वैतागला होता. त्यातून संतापलेल्या युवकाने हे कृत्य केले आहे. कस्तुरबा चौकात ब्यूटी पार्लर होते त्याठिकाणी ही घटना घडली. 

पोलिसांनी सांगितले की, २६ वर्षीय युवतीला तिच्या प्रियकर पोलीस कॉन्स्टेबलने गोळी मारली. गोळी युवतीच्या डाव्या खांद्यावर लागली. ज्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर कॉन्स्टेबल युवकाने स्वत:वर पिस्तुल ताणली आणि ३ गोळ्या झाडल्या. परंतु घाबरलेल्या अवस्थेत त्याच्या हातातून पिस्तुल खाली पडली. आरोपी घटनास्थळावरुन फरार होताना ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याला पकडले. परंतु आरोपीने त्याच्या तावडीतून निसटून पळ काढला. त्याठिकाणी अन्य कर्मचाऱ्यांनी जखमी युवतीला तात्काळ हॉस्पिटलला दाखल केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तपास पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पंचनामा केला. 

आरोपी अमन हा बिहार पोलीसमधील कर्मचारी आहे. त्याची पटना येथे पोस्टिंग झाली होती. तो मूळचा महेशपूर इथला रहिवासी होता. सध्या आरोपी युवक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे असं डीएसपी राजेश कुमार यांनी म्हटलं. तर रविवारी संध्याकाळी युवती तिच्या लग्नाची तयारी करण्यासाठी ब्यूटी पार्लरला आली होती. अचानक रात्री साडे आठ वाजता कॉन्स्टेबल अमन तिथे पोहचला. त्याने युवतीवर फायरिंग केली. त्यावेळी कुणाला काहीच कळले नाही. त्यानंतर कॉन्स्टेबलने स्वत:वर बंदूक ताणली. तो फायर करणारच होता तितक्यात त्याच्या हातातून बंदूक खाली पडली असं प्रत्यक्षदर्शी ब्यूटी पार्लर मॅनेजर निधी यांनी सांगितले. 

टॅग्स :Firingगोळीबार