शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

गूढ वाढलं! संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची ७-८ दिवसांपूर्वी हत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:51 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सुरू आहे असं दमानिया यांनी सांगितले. 

मुंबई - बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित एका महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या महिलेची ५ दिवसापूर्वी हत्या झाली. घटनास्थळी पोलिसांनी पोस्टमोर्टम केले. शनिवारी बीड पोलीस कळंबमध्ये गेल्यानंतर स्थानिक पोलिसांना ही घटना कळली. अनैतिक संबंध की पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ही हत्या झाली का असा संशय आता व्यक्त केला जात आहे. 

कळंबच्या द्वारकानगर येथील एका घरात या महिलेची हत्या झाली. या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांकडून जागेवरच पोस्टमोर्टम करून लगेचच अंत्यविधी उरकण्यात आला असं दमानिया यांनी म्हटलं आहे. याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलंय की, गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या झाली आहे. संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगरमध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतंय. या महिलेची ७ ते ८ दिवसापूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलिसांना ही बातमी कळाली अन ते घटनास्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना घटना कळली. अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे.शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला व मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले. अंत्यविधीही उरकला. ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे कळंब, मनीषा मनोज बियाणी कळंब, मनीषा राम उपाडे अंबाजोगाई, मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा नावांचा वापर करायची असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, द्वारकानगरीत मनीषा बिडवे नावाच्या महिलेचा खून झालेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ तिथे पोहचलो. तेव्हा घरच्या दरवाजाला कुलूप होते. आम्ही मागील दरवाजाने आतमध्ये गेल्यानंतर तिथे महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेचा पोस्टमोर्टम रिपोर्ट येणे बाकी आहे. ही महिला संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित आहे याबाबत खात्रीशीर माहिती नाही. पोलीस तपास सुरू आहे असं पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले. 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणanjali damaniaअंजली दमानिया