शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गर्लफ्रेंडशी भांडणानंतर मुंबई पोलीस कॉन्स्टेबलनं स्वत:चं आयुष्य संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 14:58 IST

पोलीस कॉन्स्टेबल युवक आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये काही कारणास्तव भांडण झाले होते.

मुंबई - प्रेमाचा विरह कधी कुणाला सहन होतो किंवा कधी नाही. नुकतेच मुंबईच्या वरळी येथे एक धक्कादायक समोर आली आहे. जिथं मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलनं गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवलं आहे.कॉन्स्टेबलच्या आत्महत्येमागे गर्लफ्रेंडसोबत भांडण हे कारण असल्याचे उघड झाले आहे. 

या पोलीस कॉन्स्टेबलचे वय अवघे २७ वर्ष होते. त्याने केवळ आत्महत्या केली नाही तर सुसाईड करण्यापूर्वी गळ्यात फास लटकवलेला फोटो क्लिक केला आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडच्या मित्राला पाठवला. ज्यामुळे त्याने सुसाईड केली हे गर्लफ्रेंडला कळू शकेल. पोलीस कॉन्स्टेबल युवक आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये काही कारणास्तव भांडण झाले होते. कॉन्स्टेबल इन्स्टाग्रामवर दुसऱ्या मुलीशी बोलतोय हे गर्लफ्रेंडला कळाले म्हणून ती नाराज होती. रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेत आत्महत्या केली. हा युवक मुंबई पोलीस दलातील शस्त्रगार विभागात कार्यरत होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल हा गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम करत होता. एप्रिल महिन्यापासून या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. मृत कॉन्स्टेबल दुसऱ्या महिलेसोबत इन्स्टाग्रामवर बोलायचा ज्यामुळे गर्लफ्रेंड आणि त्याच्यात वाद झाला. सोमवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास वरळी सी-फेसजवळ दोघांचे भांडण झाले. त्यानंतर ६ च्या सुमारास कॉन्स्टेबलने गर्लफ्रेंडला दादर स्टेशन सोडले. त्यानंतर साडे सहा वाजता त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला सोशल मीडियावर ब्लॉक केले आणि रात्री १० च्या सुमारास गळफास घेत स्वत:ला संपवले. 

पोलिसांनी या प्रकरणी मृत कॉन्स्टेबलच्या भावाचा जबाब नोंदवला आहे. ज्याने कुणावरही संशय व्यक्त केला नाही. या घटनेत पोलिसांनी ADR रिपोर्ट नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंद केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी