शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांचा माऊस पडला, ४१ हजारांना! सुटाबुटात येऊन मॅनेजरला गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 15:41 IST

लोअर परळ परिसरात फिनिक्स पॅलेसमध्ये हे स्टोअर आहे. या ठिकाणी तक्रारदार सारिका (नावात बदल) या स्टोअर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

मुंबई : एन. एम. जोशी मार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये एका लॅपटॉप स्टोअरमध्ये काम करणाऱ्या स्टोअर मॅनेजरला सुटाबुटात आलेल्या भामट्याने माऊस खरेदीच्या बहाण्याने ४१ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे.

लोअर परळ परिसरात फिनिक्स पॅलेसमध्ये हे स्टोअर आहे. या ठिकाणी तक्रारदार सारिका (नावात बदल) या स्टोअर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ९ मे रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सूटबूट घातलेला एक व्यक्ती अन्य एका महिलेसोबत त्यांच्या दुकानात आला. महिलेने लॅपटॉप पाहण्यास सुरुवात केली तर त्या व्यक्तीने सारिका यांना माऊसची किंमत विचारली. 

 डॉलरमध्ये याचे किती पैसे होतील, अशी विचारणा केली. त्यावर सारिका यांनी भारतीय चलनात २ हजार रुपये तर अमेरिकन डॉलरमध्ये २५ अमेरिकन डॉलर होतील, असे उत्तर त्याला दिले. तेव्हा त्याने ते डॉलर सारिका यांना देण्याचा प्रयत्न केला, ज्यावर त्यांनी या स्टोअरमध्ये ते चालत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा त्याने पाचशे आणि हजार रुपयांची बंद झालेली नोट काढून त्यांना दिली. तीही स्वीकारत नसल्याचे म्हणत सारिका यांनी काऊंटरचा लॉकर उघडून त्यातील कॅश बॉक्स त्या ग्राहकाला दाखविला.

डाव्या खिशात घातल्या नोटासारिकाने शॉपचे सीसीटीव्ही फुटेज पडताळल्यावर सुटबुटात आलेल्या व्यक्तीनेच नोटा हातचलाखीने डाव्या खिशात घातल्याचे दिसले आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

-  त्या इसमाने पाचशेच्या नोटांचे बंडल घेऊन नोटा पाहिल्या आणि त्या विस्कळीत केल्या. - सारिका यांनी त्याच्याकडून नोटा काढून घेतल्या आणि चांगली सेवा दिल्याबद्दल त्याने १० यूएस डॉलर त्यांना देऊ केले जे देखील सारिका यांनी स्वीकारले नाहीत.-  अखेर थोडा वेळ स्टोअर फिरल्यानंतर डॉलरचे रुपयांमध्ये एक्सचेंज कुठे करून मिळतील, असे विचारत पत्ता घेऊन ते दोघेही बाहेर निघून गेले.-   त्यानंतर सारिका यांनी नोटा मोजल्या तेव्हा त्यातून पाचशे रुपयांच्या ८३ नोटा म्हणजे ४१ हजार ५०० रुपये गायब होते. -  सारिका यांनी सहकाऱ्यांकडे कॅश बाबत विचारणा केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई