शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आईशी भांडणाऱ्या वडिलांवर अल्पवयीन मुलाने केले चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 21:36 IST

उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू; आई, मुलावर खुनाचा गुन्हा दाखल

दयानंद पाईकराव, नागपूर: चारित्र्यावर संशय घेऊन आईशी भांडण करून तिला शिविगाळ करीत असलेल्या वडिलांवर १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने चाकुने वार केल्याची घटना ७ मार्चला रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यात उपचारादरम्यान जखमी वडिलांचा मृत्यू झाला असून कळमना पोलिसांनी आई आणि मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रताप नामदेव कुळमेथे (४०, प्लॉट नं. ३९, शनि मंदिराच्या मागे, बजरंगनगर कळमना) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर चंदा प्रताप कुळमेथे (३५) आणि १७ वर्षाचा विधी संघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत. ७ मार्चला रात्री ९ वाजता प्रताप हा चंदाच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत वाद घालत होता. पती-पत्नी एकमेकांना शिविगाळ करीत असताना प्रतापने भाजी कापण्याचा चाकु घेऊन चंदाला मारण्यासाठी धावला असता चंदाने चाकु ओढल्याने तिच्या हाताला मार लागला. ती ओरडल्यामुळे बाजुच्या खोलीत असलेला तिचा १७ वर्षाचा अल्पवयीन मुलगा मदतीसाठी धावला. वडिलांच्या रोजच्या भांडणामुळे रागाच्या भरात त्यांनी प्रतापच्या हातातून चाकु हिसकला.

त्यानंतर विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिल प्रतापच्या पोटावर ३ आणि छातीवर एक वार करून त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी प्रतापला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले. तेथे प्रताप हा दारु पिण्याच्या सवयीचा असल्याचे सांगून अंगणात पडून जखमी झाल्याची माहिती दिली. मेयो रुग्णालयात वॉर्ड क्रमांक ३१ मध्ये अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असताना १५ मार्चला सायंकाळी ५.४५ वाजता डॉक्टरांनी प्रतापला तपासून मृत घोषित केले. कळमनाचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल तांबे यांनी वैद्यकीय अहवालावरून प्रतापला ठार मारल्याचे निष्पन्न झाल्यामुळे प्रतापची पत्नी चंदा आणि विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, २०१, २०२, २०३, २१२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी