शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कामाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला ८० हजारात परराज्यात विकले; संशयिताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 19:11 IST

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला  आहे. 

अल्पवयीन मुलीस केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवत तिचे परराज्यात बळजबरीने लग्न लावून देत तिला 80 हजारात विकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधे उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला  आहे. 

केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवत नाशिकच्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून एका महिलेने तिला आळंदी या ठिकाणी नेत 80 हजारात तिचा सौदा करत हैदराबाद येथील तरुणांशी बळजबरीने विवाह लावून दिला. आणि त्यानंतर त्या मुलीस हैदराबाद या ठिकाणी नेऊन डांबून ठेवले. मुलीने मात्र हुशारी दाखवत तुम्ही माझा घरी चला माझ्या घरच्यांना सांगा असे सांगत त्यांना घेऊन पुणे या ठिकाणी आली. त्या ठिकाणी आरडा- ओरड केली असता स्थानिक नागरिकांनी तिची विचारणा केली. त्यावेळेस मुलीने परिस्थिती सांगितल्यानंतर पुण्याच्या नागरिकांनी मुलीच्या भावांशी संवाद साधत घडलेला प्रकार सांगितला. 

यानंतर त्यांनी तातडीने मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणले असता या ठिकाणी संबंधित महिला आणि तरुण आले असता त्यांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागले.  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित महिला व एकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. घडलेला प्रकार मुलीने सांगितला असून या त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

परराज्यात मुलीला नेत तिची विक्री करणे आणि लग्न लावून देणारे असे आणखी काही या मंडळींनी केले आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. यातून मुलींना विक्री करण्याची मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. या मुली बाबतचे घडले ते तर कोणासोबत घडू नये यामुळे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी एका महिला एजंट सह एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत. या माध्यमातून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तविले आहे.

टॅग्स :ArrestअटकNashikनाशिक