शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या झाली गायब, आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By दिलीप दहेलकर | Updated: February 1, 2024 15:29 IST

कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फुस लाऊन पळवून नेले असल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.

गडचिरोली : कुटंबियांना काहीही न सांगता घरातून निघुन गेलेली १६ वर्षीय मुलगी सायंकाळी परतली नाही. सर्वत्र शोधाशोध व नातेवाईकाकडे चौकशी करूनही मुलगी सापडली नाही, त्यामुळे तिच्या वडीलांनी थेट आरमोरी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली. 

आरमोरी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील इयता अकरावीला शिकणारी अल्पवयीन मुलगी २२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान घरच्यांना काहीही न सांगता घरातुन निघुन गेली. ती सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईवडील व नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती सापडली नाही. घरी परत येईल, या आशेवर कुटुंबियांनी चार दिवस प्रतिक्षा केली. मात्र मुलीचा शोध न लागल्याने अखेर वडीलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फुस लाऊन पळवून नेले असल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलगी व अज्ञात आरोपी कुणाला सापडल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आरमोरी पोलिसांनी केले आहे.

तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी २८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहीती पोलिस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गावालगतचा मुलगाही गायब?गायब झालेली अल्पवयीन मुलगी ही अकरावीला शिकत असून ती गावानजीकच्या शाळेत जाते. तिच्या गावालगतच्या एका गावातील मुलासोबत तिचे सूत जुळले होते, सदर प्रेमप्रकरणातून दोघेही गायब असल्याची खमंग चर्चा परीसरात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी