शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून विवाहित महिलेसह भावाचे अपहरण, मलकापुरात दोघांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 22:32 IST

Crime News: घरात घुसून तोडफोड व मारहाण करून विवाहित महिला व तिच्या भावाचे अपहरण केल्याची घटना येथील अशोकनगरात गुरुवारी रात्री घडली. त्यात मलकापूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

- हनुमान जगतापमलकापूर- घरात घुसून तोडफोड व मारहाण करून विवाहित महिला व तिच्या भावाचे अपहरण केल्याची घटना येथील अशोकनगरात गुरुवारी रात्री घडली. त्यात मलकापूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.शहरातील अशोकनगरातील रहिवासी गजानन ठोसर यांनी बँकेत नोकरी लावून देतो, म्हणून घेतलेली रक्कम परत घेण्यासाठी काहीजण वारंवार त्यांच्या घरी आले. परंतु, त्यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गुरुवारी सायंकाळी अशोकनगरात काहीजण ठोसर यांच्या घरी पोहचले. त्यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली. मग त्यानंतर घरातील साहित्याची तोडफोड करून घरातील व्यक्तींना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी गजानन ठोसर यांच्या पत्नी रूपाली गजानन ठोसर व त्यांचा भाऊ शिवम श्रीनाथ अशा दोघांनाही जबरीने सोबत घेऊन गेले. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याप्रकरणी अपहरण झालेल्या विवाहित महिलेच्या भगिनी वैशाली रवि रत्नपारखी यांनी मलकापूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध संगनमताने घरात घुसून तोडफोड व मारहाण त्याचबरोबर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रामावतार रघुनाथ लोधी, शिवलनगर भुसावळ व मुन्ना विरसींह जमरे (रा.हेलपाडावा चौपाले, जि.खरगोन) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दि. ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

याप्रकरणी घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रतनसिंह बोराडे करीत आहेत, तर शहर पोलिसांचे एक पथक सहायक पोलिस निरीक्षक बालाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या बाहेरगावी रवाना झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा