शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत हॉटेलमध्ये जेवताना घेरुन एकाची हत्या; टोळक्याचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 00:34 IST

सिडको भागात झालेल्या या हल्याने  संपूर्ण सिडको परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नरेंद्र दांडगव्हाळनाशिक : येथील सावता नगर भागातील हॉटेल प्रयांशी येथे रात्री नऊ ते सवा नऊ वाजेच्या सुमारास जेवत असलेल्या चार जणांपैकी एकावर बाहेरून आलेल्या टोळक्याने  दगडफेक करीत प्लेव्हर ब्लॉक डोक्यात मारुन परशुराम बाळासाहेब नजान ( २५रा.पाथर्डी फाटा)  या युवकाची हत्या केल्याची घटना मंगळवारी( दि.25) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. 

सिडको भागात झालेल्या या हल्याने  संपूर्ण सिडको परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर काही क्षणातच सिडकोत  खून झाल्याची बातमी पसरली . घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत संशयतांच्या मार्गावर पोलिसांची विविध पथके पाठवली आहे. मारहाण करणारे संशयित कामटवाडे गाव येथील असल्याची माहिती समजते आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशुराम बाळासाहेब नजान( २५ रा.पाथर्डी फाटा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी परिसरात बघायला मिळाली अंबड पोलीस ठाण्यासह युनिट एक व तसेच युनिट दोनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन तपास करीत होते.अद्याप हत्येचे कारण समजू शकले नसून यादृष्टीने पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

टोळी युध्दाची दुसरी घटनादहा दिवसात सिडकोत मागील रविवारी (दि.१६) गोळीबार करून राकेश कोष्टी याला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खुनाचा प्रकार समोर आल्याने सिडकोवात्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलीस प्रशासनाचा धाकच नसल्याने पोलीस यंत्रणा करते तरी काय असा प्रश्न या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. परशुराम याच्या छातीवर व डोक्यास जबर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात जाईपर्यत त्याचा मृत्यु झाल्याचे समजते . रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी माहिति घेण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात 

परशुराम व त्याचे साथीदार हॉटेलमध्ये जेवत असताना झालेल्या हल्ल्याची घटना परिसरतील सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी