शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साप जाळतोय म्हणत खून करून पत्नीचा मृतदेह जाळला; पतीच्या कबुलीने पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 15:37 IST

आरोपी राधू पत्नी दयासोबत तिथे राहत होता. राधूची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती.

धार - पतीने पत्नीला बेदम मारले त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. मग मृतदेहाचं काय करायचा हा प्रश्न उभा राहिला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह घरच्या मागील जागेस जाळण्याचं ठरवले तेही दुपारच्या वेळेत. घरच्या मागे पती पत्नीचा मृतदेह जाळत होता त्याच्यावर कुणाला संशयही आला नाही. जेव्हा शेजारच्यांनी विचारले तेव्हा साप जाळतोय असं म्हटलं. पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि २४ तासांत सर्व खेळ संपला. 

मध्य प्रदेशच्या धार इथं पिपरीहुरा डेहर गावात ही भयानक घटना घडली आहे. आरोपी राधू पत्नी दयासोबत तिथे राहत होता. राधूची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती. लोकांनी तिच्याबद्दल राधूला विचारणा केली तेव्हा ती नर्मदा परिक्रमा करण्यास गेल्याचं सांगण्यात आले. दयाच्या कुटुंबाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचाही दयाशी संपर्क झाला नाही. दुसरीकडे दयाबद्दल राधू सर्वांना वेगवेगळी कारणे सांगत होता. पतीनं दिली कबुलीकाही दिवसांनंतर दयाच्या कुटुंबांने पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. पती राधूला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पतीने सांगितलेली घटना ऐकून पोलीसही हैराण झाले. राधू बनावट कहाणी ऐकवत होता. त्यानंतर खाकीचा धाक दाखवताच राधूने आता दयाची केवळं हाडे शिल्लक उरलीत असं म्हटलं. 

साप सांगत पत्नीचा मृतदेह अंगणात जाळला घरच्या मागे पत्नीचा मृतदेह जाळल्यानंतर पती राधूने तिची हाडे जमिनीत पुरली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दयाची हाडे जप्त केली. दिवसाढवळ्या पती राधूने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह जाळला होता हे ऐकून शेजारच्यांनाही धक्का बसला. साप जाळतोय सांगत त्याने पत्नीचा मृतदेहच जाळला. अखेर पतीने हे कृत्य का केले असा प्रश्न सर्वांनाच पडला. 

जमीन विकण्यावरून झाला होता पती-पत्नीत वाद राधूने काही दिवसांपूर्वी जमीन विकली होती. या जमीन विक्रीवरून राधूची पत्नी दया नाराज झाली होती. ही जमीन विकू नये असं पत्नीला वाटायचे. यावरून पती-पत्नीत वाद व्हायचा. या वादातून पती राधूने पत्नीला बेदम मारले. रागाच्या भरात पतीने पत्नीने गळा दाबून खून केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी