शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

निर्घृण खूनाने पुणे शहर हादरले, लाईन बॉय विजय ढुमेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 22:31 IST

विजय ढूमे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.. विजय हा लाईन बॉय होता..

- किरण शिंदेपुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत संपन्न झाल्यानंतर पुणे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र विसर्जन मिरवणुका संपन्न होतात तोवरच पुन्हा एकदा पुणे शहर निर्घृण खुनाने हादरले आहे.. शहरातील सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाचा अतिशय निर्घृणरित्या खूण करण्यात आला.. बांधकामाच्या लोखंडी सळई आणि भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून हा खून करण्यात आलाय.. शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली...

विजय ढूमे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.. विजय हा लाईन बॉय होता.. तो सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा होता.. शहरातील राजकीय व्यक्तीसोबत त्याची उठवत होते.. इतकच नाही तर अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे मैत्रीचे संबंध होते.. आज सायंकाळच्या सुमारास तो सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील क्वालिटी लॉज मध्ये गेला होता.. लॉज मधून बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात मारहाण केली.. या संपूर्ण घटनेत गंभीर जखमी झालेल्या विजयचा जागीच मृत्यू झाला..

दरम्यान खून झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.. यातील एका सीसीटीव्ही कॅमेरा विजय जाताना दिसतोय.. त्यानंतर चार ते पाच मारेकरी ही या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.. मात्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी आणि शहरातील राजकारण्यांची घनिष्ठ मैत्री असणाऱ्या एका व्यक्तीचा अशा प्रकारे निर्घृणपणे खून झाल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे..

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी