शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दगडानं केली मित्राची हत्या, पेट्रोलनं मृतदेह जाळला; एका चप्पलेनं खुलासा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 13:58 IST

तपासात रात्री उशीरा बिजनौर रोडवर जंगलात अर्धवट जळालेल्या स्थितीत सनीचा मृतदेह सापडला

लखनौ – शहरातील एका युवकानं आधी त्याच्या मित्रासोबत बसून दारू प्यायली त्यानंतर नशेत विट मारून त्याची हत्या केली. इतकेच नाही तर युवकाने मित्राचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आणि घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळी मिळालेल्या मृतदेहाच्या चप्पलेने याचा खुलासा झाला. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुरुवातीच्या तपासात चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचं समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या बंथरा भागात राहणारा ३२ वर्षीय सनी बँकेत १ लाख रुपये जमा करण्यासाठी गेला होता. परंतु संध्याकाळपर्यंत तो घरी परतला नाही. सनीचे वडील अवधेश सिंह यांनी मुलगा घरी आला नाही म्हणून सगळीकडे शोधाशोध सुरू केली. संध्याकाळी गावाजवळच सनीची बाईक संशयास्पद स्थितीत आढळली. काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज आल्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सनीचा शोध सुरू केला.

तपासात रात्री उशीरा बिजनौर रोडवर जंगलात अर्धवट जळालेल्या स्थितीत सनीचा मृतदेह सापडला. सुरुवातीला पोलिसांनी सनीच्या घरच्यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. माहितीनुसार, सनी त्याचा मित्र दुर्गेशसोबत ९ ऑगस्टला घरातून बाहेर निघाला होता. दोघे एकत्र होते. त्यात सनीने मोबाईल खरेदी केला आणि ढाब्यावर जेवण केले. ८००० रुपये स्मॅक आणि दारू प्यायली. तेव्हा दुर्गेशचे लक्ष सनीच्या पैशांवर पडले.

सनीच्या पाकिटातील पैसे पाहून दुर्गेशला लालसा आली. त्यात दुर्गेशने सनीची हत्या केली. सनीच्या मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी दुचाकीतील पेट्रोल ओतून सनीचा मृतदेह जाळला आणि पैसे घेऊन तो फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी सनीची चप्पल सापडली. या चप्पलेवरून सनीची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून दुर्गेशला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच दुर्गेशने सनीची हत्या केल्याचे कबुल केले. सध्या या प्रकरणी पोलीस आणखी तपास आणि पुरावे गोळा करत आहे. आरोपीला जेलमध्ये ठेवले असून लवकरच कोर्टात हजर करणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी