शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाब्दिक बाचाबाचीतून मित्राची १४ वार करून हत्या, चार अल्पवयीन मुले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 08:08 IST

मानखुर्द परिसरात राहणाऱ्या बिस्मिलाह मेहबुब शेख (वय ५५) यांच्या तक्रारीवरून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त

मुंबई : रागाच्या भरात मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये घडली. शाब्दिक बाचाबाचीतून हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले अन् कोयता आणि तलवारीचे तब्बल १४ वार करत मित्राची हत्या केली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून ४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मानखुर्द परिसरात राहणाऱ्या बिस्मिलाह मेहबुब शेख (वय ५५) यांच्या तक्रारीवरून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तय्यब अझहर खान असे मृत मुलाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात, मानेवर आणि हातावर १४ वार करण्यात आले. खानची आई दुबई येथे घरकाम करण्याची नोकरी करते. वडील हे त्यांच्यापासून वेगळे झाले आहेत.  त्यामुळे तो आजीकडे राहण्यास होता. तय्यब आणि आरोपींना नशेचे व्यसन होते. 

 मानखुर्द लल्लुभाई कंपाऊंड येथील एका कॉन्व्हेन्ट शाळेच्या शेजारी असलेल्या पडक्या शौचालयात ते नशापानी करण्यासाठी बसले होते.  ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६  ते ५ जानेवारी दुपारी २ च्या दरम्यान ही घटना घडली. तय्यब हा नेहमीप्रमाणे नशापानी करण्यासाठी बसला होता.  यादरम्यान आधीच्या भांडणातून किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली. याच रागात चौकडीने त्याच्यावर नशेत कोयता, तलवारीने वार केले. गुरुवारी त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. तय्यबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला.   खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी चौकडीला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत वरील घटनाक्रम उघडकीस आला आहे.  किरकोळ वादातून हत्या झाल्याचे मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी