शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चुगली लावल्याच्या वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 11:26 IST

तिघांनाही दारूचे व्यसन होते. रात्रभर ते दारू पीत बसले होते. दारूवाल्याकडे चुगली करतो या कारणावरून पहाटे वाद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : दारूवाल्याकडे चुगली लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांनी अन्य एका मित्राला लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने जिवे मारून त्याचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.  पोलिसांनी दाेघांना एका दारूच्या गुत्त्यावरून अटक केली.

राजेश रामवृक्ष सहानी (वय ३८) असे मृत मित्राचे नाव आहे. याप्रकरणी दादू मटू जाधव ऊर्फ पाटील (वय ४५) आणि विनोद पडवळ या दोघांना दोन तासांतच अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. हा हत्येचा प्रकार पूर्वेतील सोनारपाडा गावदेवी मंदिराच्या समोरील साईश्रद्धा बिल्डिंगमध्ये घडला. तिघांनाही दारूचे व्यसन होते. रात्रभर ते दारू पीत बसले होते. दारूवाल्याकडे चुगली करतो या कारणावरून पहाटे वाद झाला. तो विकोपाला गेला आणि दादू आणि विनोदने राजेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दांडक्याने प्रहार केले. यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. 

खिडकीतून फेकले अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असे भासवण्यासाठी त्याला दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकले तसेच घरात पडलेले रक्त कपड्याने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  शुक्रवारी सकाळी नऊ वा. एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बिल्डिंगच्या मागे पडला असल्याचे मानपाडा पोलिसांना कळवले.   प्राथमिक चौकशीत एका घरातून रात्री भांडणाचा आवाज येत होता, तसेच शेजारी राहणाऱ्याकडे दांडका मागण्यासाठी गेला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी