शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानेच केली मित्राची वीट डोक्यात मारून हत्या; पोलिसांनी आरोपीला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 17:41 IST

वसईच्या सर डी एम पेटीट मनपा रुग्णालयात विमलेशला आणल्यावर तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मंगेश कराळे

नालासोपारा - नायगांवच्या वाकीपाडा परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय मित्राची २४ वर्षीय आरोपी मित्राने डोक्यात वीट मारून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी मित्राने मित्राच्या अंगावर भिंत पडल्याने जखमी झाल्याचा बनाव केला होता. पण डॉक्टर व वालीव पोलिसांनी हा बनावाचा डाव उधळून लावून हत्या करणाऱ्या आरोपी मित्राला मंगळवारी गुन्हा दाखल करून अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. 

वाकीपाडा येथील दत्त मंदिरासमोर राहणारा विमलेशकुमार पाठक (२८) याला त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपी मित्र विक्रम प्रजापती (२४) याने सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चाळीतील शेवटच्या मोकळ्या रूममध्ये पार्टी करण्यासाठी घेऊन गेला. दारू पिऊन दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाल्याने आरोपीने विमलेशच्या डोक्यात, तोंडावर वीटेनी व ठोशाबुक्यांनी मारहाण केली. आरोपीने विमलेशची पत्नी हेमा पाठक (२२) हीला रूममधील भिंत अंगावर पडल्याने दुखापत झाल्याचे सांगून जूचंद्र येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. पण विमलेशची स्थिती नाजूक असल्याने त्याला उपचारासाठी तेथील डॉक्टरांनी दुसरीकडे नेण्यास सांगितले. 

वसईच्या सर डी एम पेटीट मनपा रुग्णालयात विमलेशला आणल्यावर तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पण विमलेशच्या डोक्यावरील आणि चेहऱ्यावरील जखमा पाहून भिंत अंगावर पडल्यामुळे झाल्या नसल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी दिला. त्यानंतर आरोपी रुग्णालयातून पळून गेला. वालीव पोलिसांनी एमएलसीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली. सदर हत्या ही पैश्याच्या वादातून झाल्याचे पोलिसांना संशय आहे. वालीव पोलिसांनी आरोपीला सदर परिसरातून अटक करून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. विमलेशच्या पत्नीने वालीव पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार देऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnalasopara-acनालासोपारा