शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मूळव्याधाचा त्रास असलेल्या युवकाच्या शरीरात मित्राने एअर कंप्रेशरनं हवा भरली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 20:07 IST

प्राथमिक उपचारावेळी रुग्णाला पोटाशी संबंधित इंटेस्टाइनल ऑब्सत्क्षण नावाचा एक आजार आहे असं आढळलं.

अलीगड – उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे किरकोळ कारणावरून नाराज मित्राने चक्क मित्राच्याच पाश्वभागात पाइप लावून एअर कंप्रेशरनं हवा भरली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पीडित तरुणाची तब्येत बिघडताच नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुणाची अवस्था पाहून सेंटर हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

उत्तर प्रदेशातील अलीगडच्या शिवाला गावातील ही घटना आहे. याठिकाणी विजय धान कारखान्यातून मजुरी करणाऱ्यासोबत ही घटना घडली. त्याचा मित्र अनिल एचना गावचा रहिवासी असून दोघंही एकाच कारखान्यात काम करतात. अनिलने मित्र विजय शर्माच्या पाश्वभागात एअर कंप्रेशर पाइप लावून हवा भरली. ज्यामुळे विजयच्या पोटात प्रचंड हवा भरून ते टाइट झाले.

पीडित विजय शर्माचे शेजारी राजेश शर्मा यांनी सांगितले की, जेव्हा मी शेतात जात होतो तेव्हा विजयच्या मुलाचा मला फोन आला. फोनवर वडिलांची तब्येत खराब झाल्याचं त्याने सांगितले. त्यानंतर मी तातडीने विजयच्या घरी पोहचलो त्याठिकाणी विजय वेदनेने खूप व्याकुळ झाला होता. त्याता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी विजयनं अनिलने मागून हवा भरल्याचं सांगितले. त्यामुळे पोट खूप टाइट झाल्याचं पीडित विजय म्हणाला.

जिल्हा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवेश रंजन म्हणाले की, खैर ठाणे परिसरातून विजय शर्मा नावाचे रुग्ण आले होते. प्राथमिक उपचारावेळी रुग्णाला पोटाशी संबंधित इंटेस्टाइनल ऑब्सत्क्षण नावाचा एक आजार आहे असं आढळलं.  ज्याची लक्षणे यामध्ये आढळून आली आहेत. पोट फुगले होते, त्याचा वैद्यकीय इतिहासही आहे. रुग्णाला आधीच मूळव्याधचा आजार असल्याचे सांगण्यात आले. पुढील उपचारासाठी आम्ही जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजला रेफर केले आहे. जिथे त्यांचे एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड केले जाईल. त्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितले.