शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान कार्यालयाच्या नावे बनावट ई-मेल; सीबीआयकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 09:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधानांच्या कार्यालयात महत्त्वाचे अधिकारी असल्याचे भासवत आणि पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळाशी साधर्म्य साधणारा ई-मेल आयडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधानांच्या कार्यालयात महत्त्वाचे अधिकारी असल्याचे भासवत आणि पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळाशी साधर्म्य साधणारा ई-मेल आयडी तयार करणाऱ्या तीन जणांच्या विरोधात सीबीआयने दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. या भामट्यांनी दिल्ली, बंगळुरू आणि अन्य काही शहरांतील लोकांना या बनावट ई-मेल आयडीवरून संदेश पाठविल्याचे दिसून आले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी काही लोकांना पंतप्रधान कार्यालयातून ई-मेल संदेश प्राप्त झाले होते. या संदेशाद्वारे तातडीने काही व्यक्तींना संपर्क करण्याचे सूचित करण्यात आले होते. तसेच, तुमचा फोन बंद असल्याने फोनवर बोलणे  होत नाही, असे देखील कारण या ई-मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, थेट पंतप्रधान कार्यालयातून ई-मेल आल्यामुळे चक्रावून गेलेल्या या लोकांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधत तेथे विचारणा केली. परंतु, त्या ई-मेलवर ज्यांचे नाव आहे, अशा व्यक्ती पंतप्रधान कार्यालयात कार्यरत नाहीत तसेच ज्या ई-मेल आयडीवरून (@pmo.in) हा ई-मेल आलेला आहे तो देखील पंतप्रधान कार्यालयाचा नसल्याचे पीएमओमधील अधिकाऱ्यांनी या लोकांना सांगितले.

आरोपींचा शोध सुरू पंतप्रधान कार्यालयातील सहसंचालकाने पत्राद्वारे ही बाब सीबीआयच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी देखील तीन लोकांनी देशातील काही मोठ्या व्यावसायिकांना आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत संपर्क केला होता. त्या प्रकरणात देखील सीबीआयने कारवाई करत या तिनही जणांना अटक केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी